esakal | शौचास जाते असे सांगून घराबाहेर पडली अन् परतलीच नाही; तिच्या मनात काय होते देव जाणे
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

शौचास जाते असे सांगून घराबाहेर पडली अन् परतलीच नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिखली (जि. बुलडाणा) : तालुक्यातील मुरादपूर येथील अल्पवयीन मुलीने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगलवारी (ता. ५) सकाळी अघडकीस आली. पूजा श्यामप्रसाद शेटे असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, पूजा आई-वडिलांसह शेतात राहत होती. सकाळी शौचालयाला जाते असे सांगून घराबाहेर पडली. बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने घरच्यांनी शोध घेतला. त्यावेळी शेजारीच चुलत भावाच्या शेतातील विहिरीच्या काठावर तिच्या चपला आढळल्या. विहिरीत पाहिले असता पाणी गढूळ झाले होते.

घरच्यांना संशय आल्याने अंढेरा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नातेवाइकांच्या मदतीने शोध घेतला. यावेळी तिचा मृतदेह मिळाला. याप्रकरणी अंढेरा पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्या करण्यामागील कारण समोर येऊ शकले नाही. घटनेचा पुढील तपास ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड काँस्टेबल कैलास उगले करीत आहे.

हेही वाचा: ...अन् तिने धोनीच्या पत्नीसमोर माहीसाठी केले असे काही

युवकाची विष घेऊन आत्महत्या

मोताळा तालुक्यातील धोनखेड येथील ३५ वर्षीय युवकाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजता घडली. सदाशिव लोळू पालवे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. सायंकाळी त्याने विष प्राशन केले. अत्यवस्थ अवस्थेत नातेवाइकांनी तातडीने बुलडाणा जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आत्महत्या का केली याबाबत काहीही कळू शकले नाही.

loading image
go to top