Tauktae Cyclone: तौक्ते वादळाचा जिल्ह्यातील ८२ गावांना फटका

८७० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; विभागीय आयुक्तांना अहवाल सादर
Tauktae Cyclone: तौक्ते वादळाचा जिल्ह्यातील ८२ गावांना फटका

अकोला ः तौक्ते वादळाने (Tauktae Cyclone) महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात (Gujrat) व राजस्थानमध्ये (Rajasthan) कहर केला आहे. या वादळाचा फटका रविवारी अकोला जिल्ह्यातील ८२ गावांना बसला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ८७० हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झालीय. त्यात बहुतांश अकोट, तेल्हारा तालुक्यातील फळ बागांचे नुकसान आहे. याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाने मंगळवारी विभागीय युक्तांना सादर केला. Tauktae Cyclone hits 82 villages in the Akola district

तौक्ते वादळ रविवारी महाराष्ट्राच्या किणारपट्टीवर धडकले. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दिसून आला. वादळी वाऱ्यासह रविवारी संध्याकाळी अर्धा तासांपेक्षा जास्त वेळ अकोट तालुक्यात पावसाने तैमान घातले होते. त्यात अडगाव, पणज, बोर्डी, रूईखेड आदी परिसराचा समावेश आहे. याशिवाय लोहारा परिसरात वादळ वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली हाेती.

Tauktae Cyclone: तौक्ते वादळाचा जिल्ह्यातील ८२ गावांना फटका
१०३ वर्षांपासून शकुंतला रेल्वेचा लोहमार्ग इंग्रजांकडेच; कधी तुटणार गुलामीच्या बेड्या?

वाडेगाव, दिग्रस परिसरात वादळ वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. अडगाव खुर्द परिसरात विजेच्या कडकडासह पाऊस झाला हाेता. पारस परिसरालाही वादळाचा तडाख बसला. आलेगाव येथेही वादळी पाऊस झाला. या पावसाचा फटका पिकांसोबतच अनेक घरांनाही बसला. घरांवरील टिनपत्रेही उडाली हाेती. यात रूईखेड, बोर्डी, पणज परिसरातील घरांसह बोरगाव मंजूर परिसरातील घरांचा समावेश आहे.

असे झाले तालुकानिहाय नुकसान

तालुका बाधित गावे पिके नुकसान (हेक्टर)

अकाेट ७६ केळी, संत्रा, कांदा, लिंबू ७९९

मूर्तिजापूर ०२ केळी १.६०

बार्शिटाकळी ०३ पपई, लिंबू ४.४०

अकाेला ०१ लिंबू ६५

एकूण ८२ ८७०

संपादन - विवेक मेतकर

Tauktae Cyclone hits 82 villages in Akola district

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com