esakal | हॉटेलमध्ये सुरू होता आयपीएलवर सट्टा

बोलून बातमी शोधा

हॉटेलमध्ये सुरू होता आयपीएलवर सट्टा
हॉटेलमध्ये सुरू होता आयपीएलवर सट्टा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशीम, : अमरावतीत दोन दिवसांपूर्वी आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर लाखो रुपयांची उधळण सुरू असल्याचे प्रकरण उघडकीस आला. त्यानंतर बडनेरा ते अकोला मार्गावरील एका हॉटेलमध्ये छापा टाकून वाशीम येथील चार बुकींना रविवारी (ता. १८) रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.


अमरावती गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर वाशीम शहरात आयपीएल सट्ट्याचे धागेदोरे खोलवर रुजले असल्याचे दिसून येते. कैलास संजय बसंतवानी (वय २५८) रा. सिंधी कॅम्प कॉलनी, जितेंद्र रामचंद्र धामानी (वय ३७), देवेश रामप्रसाद तिवारी (वय ३८) दोघेही रा. आययूडीपी कॉलनी, आशिष रमेशचंद्र सामानी (वय ३२) रा. अकोला नाका, जि. वाशीम), अशी अटकेतील बुकींची नावे असल्याची माहिती अमरावती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास पुंडकर यांनी दिली.

हेही वाचा: 'नितेश राणे हे बेडकांचे पिल्लू आहे', आमदार पुन्हा बरसले

अकोला मार्गावर लोणी ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल लॅण्ड मार्कमधील रुम नं. २०७ मध्ये हे चारही बुकी थांबले होते. रविवारी (ता.१८) आयपीएल क्रिकेट स्पर्धेत बंगळूरू विरुद्ध कोलकता नाईट रायडर या दोन संघादरम्यान पहिला सामना झाला. त्या सामन्यादरम्यान या चारही बुकींकडून वेगवेगळ्या सट्टा लावणाऱ्या लोकांसोबत मोबाईलवरून संपर्क सुरू होता. प्रत्येकासोबत बोलताना विशेष कोडवर्डचा वापर ही मंडळी करीत होती.

हेही वाचा: RTE: प्रवेशाला पुन्हा लॉकडाउनचा फटका!

घटनास्थळावरून १९ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम, विविध कंपनीचे १० मोबाईल हॅण्डसेट किमत ६१ हजार रुपये, एमएच-१२-आरके-४४४८ क्रमांकाची चारचाकी किमत सात लाख रुपये, दहा हजार रुपये किमतीची एलसीडी, एक टीव्ही रिमोट कंट्रोल, डीटीएच बॉक्स, मोबाईल चार्जर असा एकूण सात लाख ९३ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला.

हेही वाचा: कोरोना निदानानंतरचे दहा दिवस महत्वाचे

चौघांविरुद्ध फसवणूक, विश्वासघातासह जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी (ता. १९) चौघांनाही गुन्हे शाखेच्या पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने चौघांनाही बुधवारपर्यंत (ता. २१) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या बुकीबरोबरच वाशीम शहरातील एका सट्टाकिंगला सुद्धा ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

संपादन - विवेक मेतकर


अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी : क्लिक करा