esakal | डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ढकलला पुढे

बोलून बातमी शोधा

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ढकलला पुढे
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ढकलला पुढे
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाने ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला’चा दीक्षांत समारंभ पुढे ढकलला आहे. राज्यपाल, कृषिमंत्र्यांच्या मान्यतेने हा निर्णय घेण्यात आल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी कळविले आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३५ वा दीक्षांत समारंभ ३० एप्रिल २०२१ रोजी घेण्याचे नियोजन महाराष्ट्राचे राज्यपाल (कुलपती कृषी विद्यापीठे) आणि राज्याचे कृषिमंत्री (प्रतिकूलपती कृषी विद्यापीठे) यांचे पूर्व परवानगीने तथा विद्यापीठ कार्यकारी परिषदेच्या व विद्या परिषदेच्या मान्यतेने करण्यात आले होते.

img

हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्याकरिता रीतसर परवानग्या सुद्धा घेण्यात आल्या होत्या. दरम्यान काही विद्यार्थी प्रतिनिधींनी सुद्धा दीक्षांत समारंभ पुढे ढकलण्याबाबत विद्यापीठाला विनंती केली होती. या बाबी लक्षात घेता व कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव व शासनाकडून ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत नुकत्याच जाहीर झालेल्या सूचनांनुसार गुरुवारी (ता.२२) विद्यापीठ विद्या परिषद (१८४ व्या) व कार्यकारी परिषदेच्या (३३२ व्या) तातडीच्या सभेत तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल आणि राज्याचे कृषिमंत्री यांचे मान्यतेने हा दीक्षांत समारंभ पुढे ढकलण्यात बाबत एकमताने निर्णय घेण्यात आल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.सुरेंद्र काळबांडे यांनी दिली.