esakal | शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न भंगले; पावसाने कपाशीच्या बोंड्या सडल्या
sakal

बोलून बातमी शोधा

Akola

शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न भंगले; पावसाने कपाशीच्या बोंड्या सडल्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा : आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने (Rain) कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. कपाशीच्या (Cotton) बोंड्या सडल्या असून, काळ्यापडून गळत आहेत. त्यामुळे यंदा कापसाचे चांगले उत्पादन होण्याची शेतकऱ्यांना (farmer) असलेली आशा अपूर्णच राहणार आहे.

तेल्हारा तालुक्यात बागायती पट्टा आहे. यावर्षी कपाशीच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पिकांवर शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. गेले चार दिवसांपासून संततधार पावसामुळे तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न भंगण्याची चिन्हे दिसत आहेत. तेल्हारा तालुक्यात यावर्षी बागायतदार शेतकऱ्यांनी २१ हजार आठशे ६८ हेक्टरवर कपाशी लागवड केली आहे.

गेले तीन वर्षांपासून शेतकरी दृष्काळाचा सामना करीत आहेत. यावर्षी तरी बऱ्यापैकी पीक उत्पादन होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. म्हणून सुरुवातीपासून कपाशी पिकाला खत व्यवस्थापन, फवारणीवर मोठा खर्च शेतकऱ्यांनी केला. मात्र तालुक्यात गेले चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने सर्व स्वप्न हिरावण्याची चिन्हे आहेत. शेतात पाऊल ठेवताच हृदयाचा ठोका चुकतो.

हेही वाचा: दिल्लीत दर तीन तासाला होते एका झाडाची कत्तल

कपाशी पिकांच्या प्रत्येक झाडाची बोंड सडली आहेत. पाऊस असाच सुरू राहिल्यास पुढील काही दिवसांत संपूर्ण कपाशी पीक हातातून जाण्याची शक्यता आहे. तालुक्यात मूग, उडीद पिकांवर विविध रोग आल्याने हे पीक हातचे गेले. सोयाबीनच्या शेंगांना झाडावरच कोंब फुटत आहे. त्यात आता कपाशीची बोंड सडत असल्याने शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे, असा प्रश्न पडला आहे.

हेही वाचा: दीडशे वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाची फांदी तुटली अन् चिमुकल्या भावेशचा जागीच मृत्यू झाला

मी यावर्षी बटाईने आठ एकर व घरच्या शेतात बऱ्यापैकी उत्पादन होईल या आशेवर कपाशीची पेरणी केली. पिकाला खत, फवारणीवर प्रचंड खर्च केला. मात्र पावसामुळे कपाशी बोंड्या सडल्या आहेत. असाच पाऊस सुरू राहिल्यास कपाशी पीक हातचे जाणार. उत्पादन मोठ्याप्रमाणात घटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी.

- गोपाल चिमणकार, शेतकरी, तळेगाव बाजार

loading image
go to top