esakal | पारस- निमकर्दा मार्गाव चाकूच्या धाकावर लुटले
sakal

बोलून बातमी शोधा

पारस- निमकर्दा मार्गाव चाकूच्या धाकावर लुटले

पारस- निमकर्दा मार्गाव चाकूच्या धाकावर लुटले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बाळापूर (जि.अकोला) : पारस - निमकर्दा मार्गावर वाटमारी करणाऱ्या टोळीतील चार युवकांना उरळ पोलिसांनी रविवारी काही तासांच्या आत गजाआड केले. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी पारस येथील आहेत. गुरुवार, ता. २२ एप्रिल रोजी रस्त्याने पायी जाणाऱ्या हातरुण येथील ६२ वर्षीय इसमास अज्ञात युवकांनी अडवूण मारहाण करत ४५ हजार रुपयांनी लुटले होते.

गायकवाड यांनी गुरुवारी पारस येथील स्टेट बँकेत घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी प्राप्त निधीतील ४५ हजार रुपये काढून निमकर्दा मार्गाने पायी निघाला होता. पारस रेल्वे फाटका जवळ त्यांना चौघे जणांनी अडवले व मारहाण करून चाकूच्या धाकावर खिशातील ४५ हजार रुपये लुटले. मारहाणीत मुरलीधर गायकवाड हा इसम गंभीर जखमी झाला. त्यामुळे काल रविवारी ता. २५ रोजी उरळ पोलिस स्टेशन गाठत त्याने पोलिसांना घटनेची माहिती कथन केली. ठाणेदार अनंतराव वडतकार यांनी क्षणाचा विलंब न लावता आपले पोलिस कर्मचारी पारस येथे रवाना केले. उरळ पोलिसांनी स्टेट बँकेपासून निमकर्दा मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. फुटेजमध्ये सदर युवक पारस येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून एका युवकाला ताब्यात घेतले. त्याने गुन्हा कबुल करीत इतर तीन सहकार्यांची नावे सांगितली. त्यानंतर आशिष बाबुराव खंडारे, राहुल बाबुराव भगत, अक्षय दादाराव खंडारे व अनिल आनंद घोगले यांना पोलिसांनी अटक केली.

संपादन - विवेक मेतकर

loading image