esakal | महिलांनो, घराबाहेर पडताना सावधान! सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट
sakal

बोलून बातमी शोधा

theft

महिलांनो, घराबाहेर पडताना सावधान! सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : सणासुदीचे दिवस...गणेशोत्सवाची धूम...दसरा-दिवाळीसाठी खरेदीची लगबग...अन् महिलांची दागिणे घालून बाहेर पडण्याची हौस...सारे काही चोरांच्या पथ्यावर पडणारे...म्हणून महिलांनो, घराबाहेर पडताना सावध राहा...गळ्यातील दागिणे, हातातील बॅग, मोबाईल सांभाळा व होणाऱ्या अप्रिय घटना टाळत मालमत्तांचे स्वसंरक्षण करून चोरीच्या घटना (theft incident akola) टाळण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.

हेही वाचा: अर्ध्यावरच प्रेमाचा संसार मोडून गेली, डेंगीने घेतला बळी

जिल्ह्यामध्ये सध्या चैन स्नॅचिंग, मोटारसायकल चोरी, घरफोडी, बॅग लिफ्टींग, मोबाईल चोरीचे प्रकारामध्ये वाढ झाली आहे. अशा प्रकारचे गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा याकरिता जनतेनेच स्वतःच काळजी घेवून नुकसान टाळावे, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे. महिलांनी मॉर्निंग वॉक तसेच बाजारात व इतर ठिकाणी जातांना परिधान केलेले दागिने हे व्यवस्थित झाकलेले असावेत. शक्यतो मॉर्निग वॉकला जातांना दागिने परिधान करू नयेत तसेच एकटे जाणे टाळण्याचे आवाहनही पोलिस अधीक्षकांनी केले. कोणत्याही अनोळखी इसमांसोबत बोलताना दागिन्यांची व पर्सची तसेच मोबाईल फोनची काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली.

अनोळखी इसमांची माहिती पोलिसांना द्या! -

परीसरामध्ये अनोळखी मोटारसायकल स्वार संशयीतरीत्या विनाकारण फिरताना आढळून आल्यास तत्काळ संबंधित पोलिस स्टेशनला याबाबत माहिती द्यावी. असे व्यक्ती पत्ता विचारण्याचे बहाण्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असल्यास त्याचे पासून सुरक्षीत अंतर ठेवावे. महिला व गृहिणी एकट्या बाहेर फिरताना कोणी आपला पाठलाग करीत असल्यास आपली दिशा बदलावी. आसपासचे लोकांना मदतीस बोलवावे. ज्या महिलांना मुलांना शाळेत ने आण करण्यासाठी बाहेर पडावे लागते त्यांनी शक्यतो वर्दळीच्या रस्त्याचा वापर करावा.

याबाबतही राहा दक्ष -

  • दागिने चमकवून देण्याचे बहाण्याच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक

  • राहते घर, दुकान परीसरात सीसी कॅमेरे लावा

  • सोसायटी, फ्लॅट या ठिकाणी रात्रीचे वेळी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी, त्याची माहिती पोलिसांना द्या

  • कोणतेही व्यक्ती लसीकरण, रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदानकार्ड, पंतप्रधान आवास योजना अथवा कंपनीचे प्रतिनीधी बाबत सर्व्हे करीत असतील तर त्यांचे व्हेरीफिकेशन करावे, कोणालाही घरात प्रवेश देवू नये.

  • बाहेरगावी जाताना घराचे दारे व खिडक्या व्यवस्थित बंद कराव्यात.

  • नगदी रक्कम व दाग दागिने बँकेचे लॉकरमध्ये ठेवावे.

  • परीसरात नवीन फेरीवाले आल्यास त्यांना त्यांचे ओळखपत्र विचारावे.

  • ओळखपत्र नसल्यास पोलिसांना माहिती देवून त्यांचा फोटो मोबाईल फोनमध्ये काढून घ्यावा.

  • मोटरसायकल पार्क करताना तिला व्यवस्थित हँडललॉक करावी तसेच चैन लॉक लावावे.

  • रात्रीचे वेळी मोटरसायकल पार्क करताना शक्यतो घराचे आवारात पार्क करून आवाराचे गेटला कुलुप लावून ठेवावे.

loading image
go to top