ट्रकची दुचाकीला धडक : मामा-भाचे ठार

ट्रकची दुचाकीला धडक : मामा-भाचे ठार

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील जामठी फाट्याजवळ भरधाव ट्रक व दुचाकीची धडक होऊन मंगळवारी (ता.२२) सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले.
बोरगाव मंजू जवळील सिसा-मासा येथील संतोष रमेश शिंदे (वय ३५) व प्रकाश गंगाराम जाधव (वय ४५) हे दोघे मामा-भाचे मुलगी पाहण्यासाठी दुचाकीने (क्र .एम एच ३० बी एम ४०९८) जामठी बुद्रुक येथे गेले होते. कार्यक्रम आटोपल्यावर जामठी येथून सिसा-मासा या त्यांच्या गावी परत जात असताना जामठी फाट्याजवळ अमरावतीकडून अकोल्याकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकने (क्र .सी जी ०४ एम सी ५०९९) त्यांच्या दुकाचीला जबर धडक दिली. दुचाकीस्वार व मागे बसलेला इसम जागीच ठार झाले. (Truck hits two-wheeler: uncle-nephew killed)

माना पोलिसांना माहिती समजताच ठाणेदार संजय खंडारे, पोलिस उपनिरीक्षक घनश्याम पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक बाळकृष्ण नलावडे, जमादार दिलीप नागोलकर, शिपाई चेतन राऊत, प्रवीण ठाकरे, राजेश डोंगरे, शशिकांत इंगळे, आकाश काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त दोघांनाही १०८ क्रमांकाच्या रुग्ण वाहिकेद्वारे मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले. वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. या प्रकरणी माना पोलिस स्टेशनला ट्रक चालका विरुद्ध भादवी २७९ , ३०४ (अ) १८४ महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास माना पोलिस करीत आहेत.

Truck hits two-wheeler: uncle-nephew killed

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com