कार-दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू; दोघे जखमी

दुचाकीवरील पुरुष व एका दुचाकीवरील महिलेचा उपचारादरम्यान जालना येथे मृत्यू
Two killed in car-bike accident 2 injured Buldana
Two killed in car-bike accident 2 injured Buldanasakal

बिबी : लोणार तालुक्यात भरधाव व निष्काळजीपणे कार चालवीत दोन वेगवेगळ्या दुचाकींना वेगवेगळ्या ठिकाणी एकाच कारने धडक दिली. ही घटना मंगळवारी (ता. १२) रात्री दहा ते अकरादरम्यान घडली. यात एका दुचाकीवरील पुरुष व एका दुचाकीवरील महिलेचा उपचारादरम्यान जालना येथे मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणार तालुक्यातील सुलतानपूर ते सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड मार्गावर मंगळवारी रात्री भरधाव कारने समोरून येत असलेल्या दुचाकीला धडक दिली. यात किशोर कडूबा साळवे (रा. मलकापूर पांगरा) व प्रभाकर गोविंद घाडगे (रा. पोफळ शिवणी) हे जखमी झाले. दुचाकीला धडक दिल्याने घाबरलेल्या कारचालकाने वाहन आणखी वेगाने पळविले.

त्यामुळे कारवरील नियंत्रण गमावून बिबी येथील सानप हॉस्पिटलनजीक आणखी एका दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यात राधेश्याम मोतीला काबरा, संगीताताई प्रभाकर इंगळे, रा. बिबी गंभीर जखमी झाले. जखमींना स्थानिक ग्रामीण रुग्णालय व नंतर जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान संगीता प्रभाकर इंगळे (वय ४५, रा. बिबी, ता. लोणार) यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com