अकोला: दुचाकीची समोरा-समोर धडक; एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 20 June 2020

तालुक्यातील कौठा, पुंडा व बांबर्डा रोडवर गुरुवारी तीन वाजताच्या सुमारास दुचाकीच्या समोरा-समोर धडकेमध्ये पुंडा येथील एका ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

अकोट (जि.अकोला) ः तालुक्यातील कौठा, पुंडा व बांबर्डा रोडवर गुरुवारी तीन वाजताच्या सुमारास दुचाकीच्या समोरा-समोर धडकेमध्ये पुंडा येथील एका ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

अकोट वरून बांबर्डा गावी जाणाऱ्या दोन दुचाकी स्वारांनी पुंडा येथून जेणाऱ्या बाबुराव उर्फ आबासाहेब गणेशराव कुलट (वय ४२) यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही घटना कवठा रोडवरील खार नाल्यावर घडली. अपघात दिसताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी असलेले कुलट यांच्या डोक्याला दगडाचा जबरदस्त मार लागल्याने त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

त्यांना तातळीने अकोट ग्रामीण रुग्णालयात आणले. त्यानंतर अकोला येथील खासगी रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबतची तक्रार मृतकाच्या नातेवाईकांनी अकोला येथील रामदास पेठ पोलिस स्टेशनला दिली. दरम्यान, शुक्रवारी (ता.१९) पुन्हा त्या दुचाकीविरुद्ध तक्रार देण्यात अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनला दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two-wheeler head-on collision; Death of one in akola