सोने तारण कर्जमाफीची प्रतीक्षाच!

सोने तारण कर्जमाफीसाठी हवे ६ कोटी; मिळाले १.७५ कोटी
gold loan
gold loansakal media

अकोला : सावकारांनी त्यांच्या परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना कर्ज दिल्यामुळे सोने तारण कर्जमाफी झाल्यानंतर सुद्धा जिल्ह्यातील अनेक शेतकरी सोने तारण कर्जमाफीपासून वंचित ठरले होते. परंतु न्यायालयाने अशा शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करत कार्यक्षेत्राबाहेरील सावकारांकडून सोने तारण कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी देण्याचा निर्णय दिल्यामुळे शासनाने सुद्धा आपली अट रद्द केली आहे. त्यामुळे सहकार विभागाने जिल्ह्यातील कार्यक्षेत्राच्या अटीत अडकलेल्या २ हजार ३३६ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी शासनाला ६ कोटी ५ लाख ८४ हजार ९१० रुपयांच्या निधीची केली आहे. परंतु शासनामार्फत १ डिसेंबर रोजी केवळ १ कोटी ७४ लाख ५८ हजार २२० रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी उपलब्ध करुन दिल्यामुळे शेतकऱ्यांना सोने तारण कर्जमाफीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

विदर्भ, मराठवाड्यातील ज्या शेतकऱ्यांनी ३० नोव्हेंबर २०१४ पूर्वी परवानाधारक सावकारांकडून सोने तारण ठेवून कर्ज घेतले होते, त्यांचे सोने तारण कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता. मात्र या योजनेमध्ये परवानाधारक सावकाराने परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील व्यक्तीस दिलेले सोने तारण कर्ज माफ होणार नाही, अशी अट असल्यामुळे केवळ ४९ शेतकऱ्यांचे तीन लाख ९६ हजार रुपये एवढेच सोने तारण कर्ज हे माफीसाठी पात्र ठरले होते. परंतु, त्यानंतर या प्रकरणात न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे राज्य सरकारने सावकारांनी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील शेतकऱ्यांना दिलेली सोने तारण कर्जेही माफ करण्याबाबत निर्णय दिला होता. २ हजार ३३६ शेतकऱ्यांसाठी सहकार विभागाने शासनाकडे ६ कोटी ५ लाख ८४ हजार ९१० रुपयांच्या निधीची मागणी केलेली आहे, परंतु केवळ १ कोटी ७४ लाख ५८ हजार रुपयांचा निधीच उपलब्ध करुन दिला आहे.

आधी दोन तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ

सावकाराकडे सोने गहाण ठेवणाऱ्या पातूर व अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वात आधी सोने तारण कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या तालुक्यातील १ हजार ६३७ शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज घेतले होते. त्याची रक्कम ४ कोटी ५७ लाख ८० हजार २१ रुपये होते. परंतु केवळ १ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी मिळाल्याने व पातूर तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांचे तात्काळ कर्जमाफ होणार नाही, हे निश्चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com