वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीत उभारले कोविड सेंटर, उद्घाटन करणार कोण?

कोविड सेंटर
कोविड सेंटरesakal

सिंदखेडराजा (जि.बुलडाणा) : कोरोना संसर्ग दुसर्‍या लाटेत प्रचंड वाढल्यामुळे रुग्णालय कमी पडले. यासाठी तातडीने सिंदखेडराजा येथील वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीत ऑक्सिजनयुक्त बेडसह कोविड रुग्ण उभारले. परंतु, अद्यापही ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेतच असल्यामुळे संपूर्ण लाट ओसरल्यानंतर उद्घाटन होणार की काय असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहे. सध्या सिंदखेडराजा येथील रुग्ण जालन्यासह इतरत्र ठिकाणी उपचार घेण्यासाठी जात आहे. (Waiting for the inauguration of the Covid Center at Sindkhedraja in Buldana)


तालुक्यात गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पालकमंत्री तथा आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी प्रशासनाला 40 ऑक्सिजनयुक्त बेड सुविधेसह 60 खाटाचे रुग्णालय सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर प्रशासनाने रुग्णालय सुरू करण्याची जागेची पाहणी झाली. प्रशासनाकडून जिजाऊ सृष्टी जवळ असलेल्या जिजाऊ हॉस्पिटलच्या जागेची पाहणी केली होती. परंतु, काही तांत्रिक अडचणीमुळे ते ठिकाण रद्द करण्यात आले.

त्यानंतर शहरातील पुरातत्त्व विभागाची वस्तुसंग्रहालय या ठिकाणची भव्य अशी इमारत ऑक्सिजन युक्त 40 बेड व 60 खाटांच्या रुग्णालयासाठी जागा निश्‍चित करण्यात आली. त्यासाठी लागणार्‍या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून उपविभागीय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांना 3 मे ला प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगाटे यांनी नियोजित वस्तुसंग्रहालय उभारण्यात येणार्‍या रुग्णालयाची पाहणी करून आढावा घेतला.

कोविड सेंटर
कोरोनामुळे आणखी तीन रुग्‍णांचा मृत्यू, १९२ नवे रुग्ण आढळले

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सुद्धा आढावा घेतला. पालकमंत्र्यांनी आढावा घेतल्यानंतर नियोजित रुग्णालयात अत्याधुनिक ऑक्सिजन युक्त बेड दाखल झाले. रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज होते. परंतु, प्रशासन तालुक्यातील कोरोना रुग्ण संपल्यावर सुरू करणार काय ? अशा प्रश्न उपस्थित होत आहे.त्यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या मनामध्ये तर्कवितर्क उपस्थित होत आहे.

कोविड रुग्णालय उभे करण्यासाठी उशीर का ?
सद्या शहरात 100 खाटाचे सीसीसी कोविड सेंटर सुरू आहे. परंतु, त्याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या ऑक्सिजन किंवा इतर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णाला उपचार घेण्यासाठी जालना, औरंगाबाद याठिकाणी जावे लागते. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सूचना देवून सुद्धा प्रशासनाकडून उशीर झाला. त्यामुळे प्रशासनाच्या अधिकार्‍यांना तालुक्यात अद्ययावत कोविड रुग्णालय सुरू करण्याची इच्छाशक्ती नव्हती की काय? त्यामुळे अद्ययावत कोविड रुग्णालयात सुरू करण्यासाठी उशीर कशासाठी झाला ? हाच खरा संशोधनाचा विषय बनला आहे.

कोविड सेंटर
बुलढाणा; रेशीम शेतीतून 11 शेतकऱ्यांनी शोधली समृध्दीची दिशा

राजकीय पक्षही झाले कॉरंटाइन
तालुक्यात पं.स महाविकास आघाडीची सत्ता आहे. यात राष्ट्रवादीचे 4 , शिवसेना 3 तर भाजप 3 सदस्य आहे. जि.प. सदस्य राष्ट्रवादी 4 तर भाजप 1 सदस्य आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्ये विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी स्वतःच्या तालुक्यामध्ये कोविड रुग्णालय सुरू केले. परंतु, सिंदखेडराजा तालुका हा अपवाद आहे. तालुक्यात विविध राजकीय पक्षात वजनदार नेते आहेत. त्यांनी सुद्धा स्वतःच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सर्कल मध्ये कोरोना रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना व जनजागृती साठी प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे तालुक्यातील नागरीकांमध्ये असंतोष आहे. निवडणूक जवळ आल्यानंतर राजकीय नेते मंडळी जवळ करण्याचा प्रयत्न करत. परंतु सद्या कोरोनाच्या परिस्थिती कोणत्याही तालुक्यातील नेत्यांनी कोरोना सेंटर तयार करण्यासाठी पुढाकार घेतला नाही.

संपादन - विवेक मेतकर

Waiting for the inauguration of the Covid Center at Sindkhedraja in Buldana

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com