ऐतिहासिक चांदणी तलावाचे भिंत कोसळली

तात्काळ उपाय योजना करण्याची नागरिकांची मागणी
Chandni Lake collapsed wall
Chandni Lake collapsed wallsakal

सिंदखेड राजा : शहरातील ऐतिहासिक चांदणी तलावाचा काही भाग कोसळलाचा तारीख 1 मार्च रोजी सकाळी काही नागरिकांच्या निदर्शनास आले त्यामुळे भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाकडून याची तात्काळ दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सविस्तर वृत्त असे की शहरातील ऐतिहासिक वास्तू पैकी एक म्हणजे चांदणी तलाव आहे. सोळाव्या शतकामध्ये या तलावाची निर्मिती करण्यात आलेली आहे त्याचा प्रमुख उद्देश म्हणजे शहरासह शेतीला पाण्याची उपलब्धता करण्यासाठी त्यांची निर्मिती करण्यात आली होती. त्या काळातील जल अभियांत्रीकीचा अतिउत्कृष्ट नमुना. या तलावाच्या समोरील भाग एका किल्ल्याप्रमाणे बांधण्यात आला असून, विलोभनीय असा परिसर याला लाभला आहे. चांदणी तलाव हे प्रेक्षणीय स्थळ आहे.

चांदणी तलावाची भिंतही संपूर्ण दगडाचे बांधकाम करून बांधण्यात आली आहे. अचानक पणे चांदणी तलावाच्या भिंतीचा काही भाग कोसळल्यामुळे जवळ असलेल्या शासकीय विश्राम गृहाच्या इमारतीला सुध्दा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या चांदणी तलावामध्ये पाणीसाठा आहे. त्यामुळे भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की भिंतीच्या संदर्भामध्ये नागपूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार करण्यात आला, कोसळल्याच्या भिंतीच्या संदर्भामध्ये माहिती देण्यात आली आहे,असून भिंतीचे काम लवकर करण्याच्या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून तात्काळ चांदणी तलावाच्या भिंतीचे काम पूर्ण करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ऐतिहासिक वास्तूचे ऑडिट करण्याची मागणी :- सिंदखेडराजा शहरातील ऐतिहासिक स्थळे आहेत याच स्थळांकडे शासनासह संबंधित विभागाचे दुर्लक्ष पाहायला मिळत आहे त्यामुळे अनेक वेळेस ऐतिहासिक स्थळांची दुरवस्था पाहायला मिळत आहे त्यामुळे ऐतिहासिक वास्तुचे ऑडिट करण्याची मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com