वाशीम : नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा; युवकाचे आत्महत्या प्रकरण

मृतकाने लिहिलेल्या सुसाईड नोटवरून ग्रामीण पोलिसांनीच नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व अभियंत्याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला
तरुणाची आत्महत्या
तरुणाची आत्महत्याsakal

वाशीम : महात्मा बसवेश्वर चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी नगर परिषद जागा देत नाही, तसेच मानसिक त्रास देत आहे. या कारणावरून वाशीम येथील गोपाल रविशंकर महाजन (वय ३१) या युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी (ता. २३) घडली. या प्रकरणी मृतकाने लिहिलेल्या सुसाईड नोटवरून ग्रामीण पोलिसांनीन नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व अभियंत्याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, वाशीम येथील नवोदय विद्यालय परिसरात राहणारे गोपाल महाजन हे अखिल भारतीय शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी महात्मा बसवेश्वर चौकाच्या र्यीकरणासाठी खासदार भावना गवळी यांच्या निधीतून ३ लाख रुपये मंजूर करून घेतले होते. यासंदर्भात पालिका प्रशासनाने तसा ठरावही दिला होता. तसेच या कामाचे कंत्राटही देण्यात आले होते.

तरुणाची आत्महत्या
Video: स्वतःचा मास्क काढून दुसऱ्याला घातला; ज्योतिरादित्य झाले ट्रोल

मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही नगराध्यक्ष अशोक हेडा मुख्याधिकारी दीपक मोरे व अभियंता विजय घोगरे हे जागा उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करून मानसिक त्रास देत होते, अशी तक्रार मृत गोपालच्या भावाने वाशीम ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीवरून व मृताच्या मोटरसायकलच्या डिक्कीत सापडलेल्या चिठ्ठीवरून वाशीम ग्रामीण पोलिसांनी नगराध्यक्ष अशोक हेडा, मुख्याधिकारी दिपक मोरे व अभियंता विजय घोगरे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com