वाशीम जिल्हा कडकडीत बंद; नागरिकांची गर्दी ओसरली

Washim district strictly closed; The crowd of citizens subsided
Washim district strictly closed; The crowd of citizens subsided

वाशीम : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्गजन्य आजाराने थैमान घालण्यास सुरुवात केली. दरदिवशी शंभरावर बाधित आढळून येत असल्याने प्रशासनाने ता.२१ फेब्रुवारीपासून सर्व दुकाने, आस्थापनांना वेळेचे बंधन लावले. शिवाय शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.

प्रशासनाच्या हाकेला ‘ओ’ देत जिल्हावासियांनी देखील लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन केल्याने संपूर्ण दिवस जिल्हा कडकडीत बंद होता. विशेष म्हणजे या लॉकडाऊनबाबत प्रशासनाने कोणतीही कठोर कारवाई केली नसली, तरी नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळल्याने रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.


जिल्ह्यात ता.१० फेब्रुवारी पासून कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सुरुवातीला बाधितांची संख्या दोन अंकी असताना अचानक उसळी घेतली असून, मागील काही दिवसांपासून दरदिवशी शंभरावर रुग्ण आढळू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली. तरीही नागरिक मात्र, बिनधास्त असल्याने प्रशासनाने कोरोना संसर्गजन्य आजार आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश बजावले आहे.

जिल्ह्यात दिवसा जमावबंदी तर, रात्रीला संचारबंदी लागू केली आहे. गर्दीला आळा घालण्यासाठी शहरातील सर्व दुकाने व आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली. सोबतच शनिवारी सायंकाळी पाच ते सोमवार सकाळी सात वाजेपर्यंत टाळे बंदीचा निर्णय घेण्यात आला. मागील लॉकडाऊनच्या काळात प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या होत्या.

मात्र, रविवारी लॉकडाऊनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला नाही, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था असो वा इतर प्रशासकीय अधिकारी देखील लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर दिसून आले नाहीत. तरीही नागरिकांनी लॉकडाऊनच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर संपूर्ण दिवस शुकशुकाट दिसून आला. कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून कारवाईची वाट न पहाता नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास जिल्ह्यात कोरोना हद्दपार करण्यास मदत होईल. अन्यथा कोरोना संसर्ग कायम राहिल्यास नजिकच्या जिल्ह्याप्रमाणे वाशीम जिल्ह्यातही लॉकडाऊनला सामोरे जाण्याची वेळ येईल.
------------------------------------------
नागरिकांची हलगर्जी रुग्णवाढीचे मूळ
कोरोना महामारीच्या दहशतीत २०२० हे संपूर्ण वर्ष गेले. दरम्यान, रुग्ण संख्या मंदावण्यास सुरुवात झाल्याने नागरिकही बिनधास्त झाले. नागरिकांच्या या हलगर्जीमुळे या जीवघेण्या आजाराने पुन्हा डोकेवर काढले. मागील दहा दिसात जिल्ह्यात बाराशेवर लोकांना कोरोनाची बाधा झाली. बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने काही प्रमाणात निर्बध लागू केले. मात्र, नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्यास कुचराई केल्यास पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जाण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com