कधी होणार तलाई गावाची भलाई? अजूनही गावात वीज नाही, अनेक मूलभूत सुविधांचा अभाव

धीरज बजाज
Tuesday, 14 July 2020

तेल्हारा तालुक्‍यातील तलाई या छोट्याशा पुनर्वसित गावात अद्याप विद्युत पुरवठा नाही. आजही रात्र अंधारात काढावी लागते. ग्रामस्थ आजूबाजूच्या गावात आपला मोबाईल चार्ज करून जगाच्या संपर्कात राहण्याच्या प्रयत्न करतात. आज सर्वत्र ऑनलाईन शाळेची चर्चा पाहायला मिळते, मात्र या गावात लाईनच नाही तर ऑनलाईन शाळा घरात कशी भरणार, असा प्रश्न उपस्थित होतो.

हिवरखेड (जि.अकोला)  ः तेल्हारा तालुक्‍यातील तलाई या छोट्याशा पुनर्वसित गावात अद्याप विद्युत पुरवठा नाही. आजही रात्र अंधारात काढावी लागते. ग्रामस्थ आजूबाजूच्या गावात आपला मोबाईल चार्ज करून जगाच्या संपर्कात राहण्याच्या प्रयत्न करतात. आज सर्वत्र ऑनलाईन शाळेची चर्चा पाहायला मिळते, मात्र या गावात लाईनच नाही तर ऑनलाईन शाळा घरात कशी भरणार, असा प्रश्न उपस्थित होतो.

तेल्हारा तालुक्‍यातील दुर्लक्षित असलेलं पुनर्वसित तलाई गाव. 21 व्या शतकात ग्रामीण भागातील बहुतांश गावांत बऱ्यापैकी सुविधा पाहायला मिळतात; मात्र पुनर्वसित तलाई या छोट्याशा गावाची कहाणी मोठी रंजक तेवढीच वेदनादायी आहे.

Image may contain: 2 people, people sitting

मुलभूत सुविधांपासून वंचित असलेलं तलाई गाव जगाच्या नकाशावरच नसल्याचं शल्य ग्रामस्थांना आहे. या दुर्दैवी गावात अद्याप विद्युत सोय नसलेल्या गावात विकासाचा सूर्य उगवेल भोळ्याभाबड्या आशेवर नागरिक आजही जगत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

हिवरखेड रेल्वे स्टेशन जवळच असलेल्या चंदनपूर बोरवा रोडवर वसलेलं नवी तलाई हे छोटसं गाव. लोकसंख्या 540, सन 2018 मध्ये मे महिन्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून आठ गावे पुनर्वसित करण्यात आली होती. त्या पैकीच तलाई हे गाव. मूलभूत सुविधापासून वंचित. शिक्षणाची सोय नाही.

Image may contain: 9 people, people standing

साधी अंगणवाडी सुद्धा गावात नाही. रुग्णांना हिवरखेड किंवा तेल्हारा येथे पायपीट करावी लागते. गत लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाने लोकशाहीचा उत्सव साजरा केला. मात्र तलाई येथील ग्रामस्थांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले.

सीबीएसई बारावी परीक्षेत अकोल्यातील विद्यार्थी चमकले 

शासनाने झटकले हात, स्वतःच उभे केले गाव!
सन 2018 मध्ये तलाई येथील प्रत्येक कुटुंबाला 10 लाख रुपये पॅकेज देवून प्रशासनाने हात वर केले. काही दिवस नागरिक निराश्रीतांसारखं जीवन जगली. जागेचा प्रश्न होता. हिवरखेड नजिक ग्रामस्थांनी जमिनी खरेदी करून स्वतःहून स्वप्नातलं गाव वसविले.

Image may contain: one or more people and people standing

मात्र समस्यांनी पिच्छा सोडला नाही. यासंदर्भात प्रसार माध्यमांनी आणि समाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी तलाई या गावाची व्यथा मांडली.

Video: अरे हे काय? पेट्रोल दिलं नाही म्हणून चक्क ऑफिसमध्येच सोडले कोब्रा नाग 

आमदारांच्या भेटीतून जागवला आशावाद
विधान परिषदेचे सदस्य आमदार अमोल मिटकरी यांनी नुकताच ग्रामस्थांशी संवाद साधला आणि शासनाकडून बेदखल हे गाव पुन्हा चर्चेत आले. दुर्लक्षित गावाची कहाणी ऐकून आमदार महोदयांनासुद्धा नवल वाटले. त्यांनी लगेच तालुका प्रशासनाला तलाई गावाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. सदर गाव सामाजिक तथा शैक्षणिक प्रवाहात येईल, असा आशावाद गावकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will Talai village prosper? There is still no electricity in the village, lack of many basic facilities