Market Committee Election : बाजार समिती निवडणूकीतून १८० जणांची माघार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Withdrawal of 180 people from market committee elections 40 candidate for 16 seats politics akola

Market Committee Election : बाजार समिती निवडणूकीतून १८० जणांची माघार

देऊळगाव राजा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत नामांकन परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी १८० जणांनी आपली उमेदवारी मागे घेतली. तर अर्थी व्यापारी मतदारसंघातील दोन्ही जागा अविरोध झाल्या असून उर्वरित १६ जागांसाठी ४० उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. प्रचारासाठी केवळ सहा दिवसाचा कालावधी मिळाल्याने उमेदवारांनी लगेच प्रचाराला सुरुवात केली आहे.

तब्बल अडीच ते तीन वर्ष येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक होते.राज्य शासनाने बाजार समिती च्या निवडणुका घोषित केल्याने बाजार समिती निवडणुकीचे पडघम वाजले. सुमारे आठ वर्षांनंतर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक लागल्याने १८ जागेसाठी उत्साहाच्या भरात तब्बल २२२ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते.

मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी केवळ ४२ उमेदवारांचे अर्ज राहिले,त्यातही अडते व्यापारी मतदारसंघातील राहुल मगनसा जैन व अनिल चंदुलाल धन्नावत अविरोध निवडून आले.आता १६ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत ४० उमेदवार रिंगणात उरले आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या यादीवर नजर टाकली असता सहकारी संस्था सर्वसाधारण प्रवर्गात एकूण १६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.

सहकारी संस्था इतर मागासवर्गीय प्रवर्ग व सहकारी संस्था महिला राखीव प्रवर्गासाठी प्रत्येकी ३ उमेदवार रिंगणात असून विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गा करिता दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. याचबरोबर ग्रामपंचायत सर्वसाधारण प्रवर्गात ६ उमेदवार तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गात तीन उमेदवार निवडणूक लढवीत आहे. ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक प्रवर्ग साठी दोन उमेदवार तर हमाल मापारी प्रवर्गासाठी ५ उमेदवार निवडणुकीच्या रणधुमाळीत आपले नशीब आजमावित आहे.

बाजार समिती निवडणुकीत २ जागा अविरोध निवडून आल्याने आता १६ जागांसाठी ४० उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहे. येत्या २८ एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १६ जागांसाठी मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे.

निवडणूकीत बहुतांश नवे चेहरे

बाजार समिती निवडणुकीत यंदा नव्या चेहऱ्यांना संधी देऊ असे सुतोवाच माजी मंत्री तथा आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले होते. महाविकास आघाडी कडून बहुतांशी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर प्रतिद्विडी गटाकडूनही नवीनच चेहरे मैदानात उतरविण्यात आले आहे. या निवडणुकीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात नव्या दमाचे संचालक मंडळ पहावयास मिळेल.

टॅग्स :Akola