जिल्ह्यात १७ टक्के शेतजमीन पेरणीविना, राज्यात पेरणी वाढली; अकोला जिल्ह्यात मात्र ८६ टक्केच

विवेक मेतकर
Tuesday, 4 August 2020

करोनामुळे उद्योग-व्यवसायांपुढे मंदीचे आव्हान असताना यंदा चांगल्या पावसामुळे शेतकरी मात्र आनंदात आहे. त्यामुळेच राज्यातील पेरणी गत वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. असे असले तरी जिल्ह्यात मात्र ८६.५५ टक्केच कृषी क्षेत्रावर खरीप पेरणी झाली असून, अद्याप १७ टक्के शेतजमीन पेरणीविना आहे.

अकोला  ः करोनामुळे उद्योग-व्यवसायांपुढे मंदीचे आव्हान असताना यंदा चांगल्या पावसामुळे शेतकरी मात्र आनंदात आहे. त्यामुळेच राज्यातील पेरणी गत वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. असे असले तरी जिल्ह्यात मात्र ८६.५५ टक्केच कृषी क्षेत्रावर खरीप पेरणी झाली असून, अद्याप १७ टक्के शेतजमीन पेरणीविना आहे.

त्यामुळे राज्यात खरीप पेरणीची स्थिती संतोषजनक असली तरी जिल्ह्यात मात्र वेगळेच चित्र असल्याचे दिसून येत आहे.

हिंगोलीत पहिल्याच पावसानंतर ...
यावर्षी राज्यात मॉन्सूनचे ११ जूनरोजी आगमन झाले. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने प्रगती केली. त्यानंतर मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापल्याचा दावा सुद्धा हवामान खात्याने व्यक्त केला होता. असे असल्यानंतर सुद्धा जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतऱ्यांना खरीप पेरणीसाठी दमदार पावसासाठी वाट पाहावी लागली.

दरम्यान, नंतरच्या काळात जोरदार पाऊस झाल्याने शेतात पेरणीची लगबग पाहायला मिळाली. त्यामुळे सुरुवातीला कमी झालेली खरीप पेरणी नंतरच्या काळात मात्र चांगलीच झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात पावसाचे असमाधानकारक चित्र असले तरी राज्यातील इतर भागात मात्र पावसाने चांगली हजेरी लावली.

agriculture story in marathi, bbf technology is proving successful ...

त्यामुळे अकोला जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात गत वर्षीच्या तुलनेत खरीप पेरणी अधिक झाली. पावसाच्या लहरीपणामुळे जुलै महिना अखेरपर्यंत जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत ८६.५५ टक्केच पेरणी होऊ शकली. जिल्ह्यातील ४ लाख ८३ हजार २९१ कृषी क्षेत्र सरासरी असल्यानंतर सुद्धा प्रत्यक्षात मात्र ४ लाख १८ हजार २८४ क्षेत्रावरच पेरणी झाल्याने अद्याप १७ टक्के क्षेत्र पेरणीविना असल्याचे दिसून येत आहे.

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांने अडचणी ...

सोयाबीनलाच पसंती
जिल्ह्यात ८६.५५ टक्के पेरणी झाली असून, सोयाबीन पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेल्या ९१ टक्के क्षेत्रावर म्हणजेच १ लाख ९९ हजार ३७३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. त्यानंतर १ लाख २२ हजार १३४ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. तूरीच्या क्षेत्रात मात्र यावर्षी कमालीची वाढ झाली असून, उद्दिष्ट ठेवण्यात आलेल्या क्षेत्राच्या १०१ टक्क्यांवर म्हणजेच ५६ हजार ७८७ हेक्टर क्षेत्रावर तूरीची पेरणी करण्यात आली आहे.
 महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये ...
अशी आहे इतर पिकांचे पेरणी क्षेत्र
खरीप ज्वारीची पेरणी ५ हजार ३४० हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे. बाजरी ४१४ हेक्टर, मका ३१० हेक्टर, मूग २० हजार २४२ हेक्टर, उडीद १३ हजार ८४४ हेक्टर, तर तिळाची पेरणी २४५ हेक्टरवर करण्यात आली आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Without sowing 17% of agricultural land in the akola district, sowing increased in the state; In Akola district, however, only 86 percent