जागतिक रक्तदान दिन : साठा पुरेसा, पण हा रक्तसाठा कधीही कमी म्हणून रक्तदान करा

भगवान वानखेडे
Sunday, 14 June 2020

दरवर्षी एप्रिल व मे महिन्यामध्ये शाळा-महाविद्यालयांना सुटी असल्यामुळे तसेच नियमित रक्तदाते बाहेरगावी गेल्यामुळे रक्ताचा राज्यात तुटवडा भासतो.

अकोला : जिल्ह्यातील कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत असून, रक्तसंकलनावर त्याचा परिणाम होत होता. मात्र, आता शासकीय रक्तपेढीत 220 पेक्षा अधिक रक्तसाठा आहे. असे जरी असले तरी हा रक्तसाठा कधीही कमी होऊ शकतो. तेव्हा दात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

दरवर्षी एप्रिल व मे महिन्यामध्ये शाळा-महाविद्यालयांना सुटी असल्यामुळे तसेच नियमित रक्तदाते बाहेरगावी गेल्यामुळे रक्ताचा राज्यात तुटवडा भासतो. असे असले तरी रक्ताची मागणी मात्र, कायम असते. त्यात भर म्हणजे यंदा सर्वत्र कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने शिबिरांच्या आयोजनावर मर्यादा आल्या आहेत. मात्र, सुरक्षा व स्वच्छतेचे पालन करुन तसेच रक्तदानाच्या ठिकाणी गदीर्चे व्यवस्थित नियमन करुन रक्तदान शिबिरे आयोजित करण्याविषयी राज्य रक्त संक्रमण परिषदेने सुचना जारी केलेल्या आहेत. 

महत्त्वाची बातमी - लहान भावाच्या मृत्यूची वार्ता ऐकली अन् मोठ्यानेही सोडला प्राण

तथापी रक्तदात्यांमध्ये रक्तदान करण्याविषयी भिती अथवा संभ्रम निर्माण झालेला आहे. प्रतिबंधक उपाय म्हणून गरजेशिवाय घराच्या बाहेर पडू नये व गर्दी करु नये हे खरे असले तरी रक्तदान हे गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. रक्तदान केल्यामुळे अथवा रक्त संक्रमणामुळे कोरोना विषाणूची लागण होत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सर्व सामाजिक, धार्मिक संस्थांनी रक्तदात्यांसाठी पुढे यावे. शिबिरे आयोजित करून गरजू रुग्णांसाठी रक्त संकलन करावे.

220 पिशव्या रक्तसाठा
अकोल्यात शस्त्रक्रीया आणि अपघातग्रस्त रुग्णांसह रक्तासंबंधित आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. या रुग्णांना रक्ताची गरज भासते. त्यामुळे गरजू रुग्णांना नियमीत रक्तपुरवठा करण्यासाठी ग्रामीण स्तरावर रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी रक्तदात्यांनी पुढाकार घ्यावा. सध्या २२० पिशव्या जरी असल्या तरी कमी पडू शकतात. तेव्हा रक्तदानासाठी समोर यावे असे आवाहन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Blood Donation Day, donate blood in akola district