
अकोला जिल्ह्यात उष्मघाताने घेतला युवकाचा बळी!
तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथील रहिवासी अल्प भूधारक शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील सचिन रमेश इंगळे (वय ३०) याचा उख्माघातामुळे मृत्यू झाला. ता. १६ एप्रिल रोजी सचिन भर उन्हात कामानिमित्त गावात ये-जा करत होता. रात्री एकाएकी पोटात दुखने, लघुशंकेला त्रास होणे, मळमळ होणे, असे त्रास सचिनला होत होते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी त्याला तेल्हारा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार चालू असतानाच ता. १६ एप्रिलच्या मध्यरात्री सचिनची प्राणज्योत मावळली.
सचिनचा मृत्यू उष्मघातानेच झाल्याचे त्याच्या कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे. ता. १७ एप्रिल रोजी सचिनवर दहिगाव येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. माझा मुलगा दिवसभर उन्हात कामानिमित्त फिरत होता. उन्हामुळेच त्याचा मृत्यू झाला आहे. उष्माघाताने आमचा कमावता सहारा घेतल, अशी भावना मृतकाचे वडील रमेश इंगळे यांनी व्यक्त केली.
दहिगाव येथील युवकाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकल नाही. सद्य परिस्थितीत उष्णतेचा पारा वाढलेला आहे, तरी नागरिकांनी आपली दैंनदिनाचे कामे शक्यतो सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेत करावीत, तसेच भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.
- डॉ.प्रवीण चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी, तेल्हारा.
Web Title: Youth Dies Of Heatstroke In Akola District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..