Ahmednagar News  Sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : शहरात रस्ते चकाचक; उपनगरांना वाली कोण, नगरसेवकांसह प्रशासनही गप्प

उपनगरांमधील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. जागोजागी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Ahmednagar News : मध्यवर्ती शहरातील रस्ते चकाचक झाले आहेत, परंतु केडगाव, बोल्हेगाव- नागापूर आणि सावेडी उपनगरातील काही भागात रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. येथील रस्त्यांचे कामे तर दूरच साधे पॅचिंगचे काम देखील अनेक वर्षांपासून रखडले आहे.

दरम्यान, महापालिकेने पॅचिंगच्या कामासाठी तिसऱ्यांंदा निवदा काढूनही ठेकेदार काम करण्यास तयार नाहीत. त्यामुळे नागरिकांना ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करावा लागत आहे.

उपनगरांमधील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. जागोजागी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी खडी उघडी पडली आहे, तर काही ठिकाणी एक ते दिड फुट खोल खड्डे पडले आहेत.

त्यामुळे नागरिकांना रस्त्यांवरून चालणे कठीण झाले आहे. महापालिका प्रशासनाने या रस्त्यांच्या पॅचिंगच्या कामासाठी प्रत्येकी ५० लाख रूपये खर्चाच्या दोन निविदा मागविल्या. परंतु या निविदांना ठेकेरांकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे फेरनिविदा काढण्याची वेळ प्रशासनावर आली. त्याकडेही ठेकेदारांनी पाठ फिरवली. त्यामुळे आता तिसऱ्यांदा निविदा काढण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.

एकीकडे खड्ड्यांमुळे रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे, तर दुसरीकडे पॅचिंगसाठी ठेकेदार मिळत नसल्याने महापालिका प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. महापालिकेत सध्या प्रशासकराज सुरू असल्याने स्थानिक नगरसेवक देखील बघ्याची भूमिका घेत आहेत. एकीकडे मध्यवर्ती शहरातील रस्ते चकाचक झाले आहेत, तर दुसरीकडे उपनगरातील रस्त्यांना कोणीच वाली नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

कामाची बिले थकली

शहरात विविध प्रकारची विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांना त्यांच्या कामाची बिले वेळेत मिळत नाहीत. या ठेकेदारांची कोट्यवधी रूपयांची बिले महापालिकेकडे थकीत आहेत. जुन्या कामाची बिले मिळत नसल्याने ठेकेदार नवीन कामे घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे शहरातील अनेक विकासकामे रखडली आहेत. ठेकेदारांची देणी देण्याचा प्रश्‍न महापालिका प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

मोठी कामेही रखडली

मध्यवर्ती शहरात १४४ कोटी रूपये खर्चाच्या भुमिगत गटार योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु मागील काही दिवसांपासून या योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. इतर काही मोठी विकासकामे देखील रखडली आहेत. केडगाव उपनगरातील शाहूनगर रस्त्याचे काम वर्षभरापासून रखडले आहे.

नगरसेवक गप्प

महापालिकेत गेल्‍या पाच महिन्यांपासून प्रशासकराज सुरू आहे. एरवी या- ना त्या कारणावरून महापालिकेत आंदोलन करणारे माजी नगरसेवक सध्या गप्प आहेत. गेल्या पाच महिन्यात या नगरसेवकांनी महापालिकेत एकही आंदोलन केलेले नाही. रस्त्यांचे पॅचिंग, नालेसफाई यासारखी प्रमुख कामे रखडली आहेत. त्यावरही नगरसेवक काहीच बोलत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT