गुलाबो सिताबो या चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
गुलाबो सिताबो या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री फारुख जफर (Farrukh jaffar) यांचे निधन झाले. शुक्रवारी लखनऊमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ८८ वर्षाच्या होत्या. फारुख यांचा नातू शाज अहमद यांनी ट्विट करत त्यांच्या निधनाची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
फारुख यांचा जन्म १९३३ मध्ये जौनपुर येथे झाला. पत्रकार आणि स्वातंत्र्य सेनानी सय्यद मोहम्मद जफर यांच्याशी लग्न केल्यानंतर त्या लखनऊला आल्या. सय्यद यांनी फारुख यांना पुढच्या शिक्षणासाठी आणि कलाविश्वात काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं. शिक्षणानंतर त्यांनी आधी ऑल इंडिया रेडिओमध्ये नोकरी केली.
पटकथालेखिका जुही चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत फारुख यांना श्रद्धांजली वाहिली. ' बेगम गेली. तुमच्यासारखं ना कोणी होतं ना असेल. आमच्यासोबत नातं जोडण्याची परवानगी दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार,' असं त्यांनी लिहिलं.
१९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या उमराव जान या चित्रपटातून त्यांनी करिअरची सुरुवात केली. यामधे त्यांनी रेखा यांच्या आईची भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी स्वदेस, सुलतान, सिक्रेट सुपरस्टार, पीपली लाईव्ह या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.