Chandrachud 
देश

Chandigarh Mayor Election: "थोडं मनोरंजन सगळ्यांसाठी चांगलंए"; सर्वांना व्हिडिओ पाहू द्या, असं सरन्यायाधीश म्हणताच, भर कोर्टात हास्यकल्लोळ

चंदिगड महापौर निवडणुकीतील गैरप्रकाराविरोधात आम आदमी पार्टीनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : चंदिगड महापौर निवडणुकीतील गैरप्रकाराविरोधात आम आदमी पार्टीनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टानं आपच्या बाजूनं निकाल देत त्यांच्या उमेदवाराला विजयी घोषित करण्याचे आदेश दिले.

पण एकूणच सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी कोर्टातील तणावपूर्ण वातावरण थोडंस हलकं फुलकं केलं. या निवडणुकीचा निकाल देणाऱ्या अधिकाऱ्याचा निकालात फेरफार करतानाचा व्हिडिओ एकदा दाखवा, असं म्हटलं. (chandigarh mayor election little entertainment cji chandrachud comic relief during big hearing)

काय घडलं नेमकं?

चंदिगड महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा 30 जानेवारी रोजी निकाल आला होता. यावेळी अवैध घोषित करण्यात आलेल्या मतपत्रिकांची खंडपीठानं तपासणी केल्यानंतर सरन्यायाधीशांकडून यापूर्वी कठोर निरीक्षणं नोंदवलेला व्हिडिओ आज कोर्टात पुन्हा सादर करण्यात आला. (Marathi Tajya Batmya)

हा व्हिडिओ प्ले होताच सरन्यायाधीशांनी या व्हिडिओची खिल्ली उडवली, "सर्वांना व्हिडिओ पाहू द्या, थोडं मनोरंजन सगळ्यांसाठी चांगलं आहे" असं त्यांनी म्हणताच तणावपूर्ण वातावरण असलेल्या कोर्टात हास्यकल्लोळ उडाला. याचिकाकर्त्यांनी व्हिडिओचा संबंधित भाग आधीच नमूद केला आहे आणि संपूर्ण क्लिप पुन्हा चालवण्याची गरज नाही, नाहीतर आपल्या सगळ्यांना 5.45 पर्यंत इथेच बसावं लागेल, असंही चंद्रचूड यावेळी म्हणाले.

तत्पूर्वी, CJI चंद्रचूड यांनी निवडणुकीचे रिटर्निंग अधिकारी अनिल मसिह यांच्यावर ताशेरे ओढले, जो मतदानानंतर बॅलेट पेपरवर चिन्हांकित करताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. मसिह यांनी आपच्या महापौरपदाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ आठ मतं अवैध असल्याचं घोषित केलं होतं.

यामुळं भाजपच्या उमेदवाराला आप-काँग्रेस युतीपेक्षा कमी मते मिळालेली असतानाही तो विजयी झाला होता. या प्रकारावरच सुप्रीम कोर्टानं मसिह यांच्यावर ताशेरे ओढले होते. तसेच असं सूचित केलं होतं की ते मतांच्या फेरमोजणीचे आदेश देऊ शकतात. (Latest Marathi News)

दरम्यान, आजच्या सुनावणीत या संकेतांप्रमाणं सरन्यायाधिशांनी बाद ठरवलेली ती ८ मतं वैध ठरवली, त्यामुळं सहाजिकचं हा निकाल बदलला गेला आणि या निवडणुकीत आपचा उमेदवार विजयी ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Government : "मतमोजणी अचानक पुढे ढकण्याच्या निर्णयाला फडणवीस सरकार जबाबदार", विरोधकांचा गंभीर आरोप

Beed Accident: गेवराईत भीषण अपघात; ट्रॅक्टरची जोरदार धडक बसून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update : ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीत ११.३० पर्यंत १७.५७% मतदान

Akot News : रोजगाराच्या शोधात मजुरांचे स्थलांतर; वीटभट्ट्यावर सर्वाधिक मजूर

Winter Lungs Health: हिवाळ्यात फुफ्फुसांची काळजी कशी घ्याल? डॉक्टरांनी सांगितले निरोगी राहण्याचे सोपे उपाय

SCROLL FOR NEXT