ghoomer trailer sakal
देश

Ghoomer Trailer : घूमरच्या ट्रेलरची धूम क्रिकेटमध्ये ही.. गांगुली पासून युवीपर्यंत सर्वानी केलं तोंडभरून कौतुक !

Ghoomer Trailer : क्रिकेटरसने हा खास ट्रेलर शेयर करत चित्रपटाला दिल्या शुभेच्छा

सकाळ डिजिटल टीम

बहुप्रतीक्षित आर. बाल्की दिग्दर्शित " घूमर " या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच झाला आणि सोशल मीडिया वर या ट्रेलर ने तुफान लोकप्रियता मिळवली. मोठ्या संख्येने लोकांनी या चित्रपटाचा ट्रेलर शेयर तर केला पण अनेक बड्या क्रिकेटरसने हा खास ट्रेलर शेयर करत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्रेलरला केवळ प्रेक्षकांकडूनच नव्हे तर क्रिकेटरसिकांकडूनही खूप प्रशंसा मिळाली आहे. सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, हरभजन सिंग, डेव्हिड वॉर्नर, रशीद खान, आणि अजिंक्य राणे आणि इतर बड्या क्रिकेटर ने आर. बाल्की दिग्दर्शित चित्रपटाच्या ट्रेलर त्यांचा सोशल मीडिया वर शेयर करत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.

सौरव गांगुलीने सोशल मीडिया वर जाऊन ट्रेलरचे कौतुक केले आणि म्हणाला, "माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक.. अभिषेक.. ट्रेलर शानदार दिसत आहे.. चित्रपटाची वाट पाहत आहे.. प्रत्येकाने बघावा असा एक चित्रपट ! सगळ्या कलाकार आणि क्रू ला शुभेच्छा @juniorbachchan"

वीरेंद्र सेहवाग म्हणाला " मी फिरकीपटूंना कधीच गांभीर्याने घेतले नाही पण हा स्पिनर्स नक्कीच खास दिसतो.

चित्रपट पाहण्याची वाट पाहत आहे.

#GhoomerTrailer"

युवराज सिंगनेही ट्रेलरबद्दल कौतुक व्यक्त केले आणि शेअर केले, “ऑल द बेस्ट

@juniorbachchan @SaiyamiKher @Imangadbedi for #Ghoomer 🙌🏻 लवकरच चित्रपट पाहण्यास उत्सुक आहे!"

हरभजन सिंगने इंस्टाग्राम वर ट्रेलर शेयर करत लिहिल " क्रिकेट सब को जोड़ती आहे. #घूमरट्रेलर आवडला. दूसरा पता है, टॉप स्पिनर पता है, ये घूमर कुछ अलग लेवल है 😊@bachchan #GhoomerTrailer #GhoomerInCinemas

#RBalki @azmishabana18 @saiyami @angadbedi"

डेव्हिड वॉर्नरने देखील व्यक्त केले, " किती विलक्षण ट्रेलर आहे. शेवटी तो डान्स बॉल आवडला @saiyami ला या भूमिकेत बघायला आवडेल. #GhoomerTrailer #GhoomerInCinemas

#RBalki @azmishabana18 @bachchan @saiyami @angadbedi"

अजिंक्य रहाणेने शेअर केले ".घूमरचा ट्रेलर आवडला "

खेळावर प्रेम करणाऱ्या @SaiyamiKher आणि @juniorbachchan साठी योग्य भूमिका :) संपूर्ण टीमला शुभेच्छा. #ghoomertrailer"

आकाश चोप्रा पुढे म्हणाले, "हे छान आहे 👏 @juniorbachchan @SaiyamiKher #RBalki #GhoomerTrailer चित्रपट पाहण्यासाठी वाट बघू शकत नाही "

हर्षा भोगले ट्विटरवर म्हणाले, "#घूमर या नवीन चित्रपटाबद्दल खूप उत्साही आहे. केवळ बाल्की नावाच्या एका मित्राने तो बनवला आहे म्हणून नाही तर ती इतकी धाडसी कल्पना आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी अभिनेता आणि क्रिकेटरची गरज आहे. @SaiyamiKher, ते पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. #GhoomerInCinemas"

अफगाणिस्तानचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू रशीद खाननेही इन्स्टाग्रामवर हा ट्रेलर शेअर केला.

“घूमरचा ट्रेलर आवडला. आता चित्रपट पाहण्याची प्रतीक्षा आहे. मला खरोखरच आश्चर्य वाटत आहे की ती शेवटची डिलिव्हरी कशासाठी होती! 🙌🏽अभिनंदन #Rbalki @saiyami @bachchan @angadbedi @azmishabana18”

पार्थिव पटेलने असेही सांगितले की "प्रेरणादायी चित्रपट @SaiyamiKher पाहण्यास उत्सुक आहे! ही एक हृदयस्पर्शी आणि सशक्त कथा आहे हे निश्चित!

ट्रेलर चुकवू नका!"

'घूमर' मध्ये अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर प्रमुख भूमिकेत आहेत तर शबाना आझमी आणि अंगद बेदी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन कॉमेंटर च्या भूमिकेत दिसणार आहेत.शिवेंद्र सिंग आणि इवांका दास यांच्याही या चित्रपटातून पदार्पण होत आहे.

हा चित्रपट आर. बाल्की यांनी दिग्दर्शित " घूमर " 18 ऑगस्ट ला रिलीज होणार आहे !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: कर्जमाफी समिती लागली कामाला; चंद्रशेखर बावनकुळे, बच्चू कडू यांनी आंदोलनाची घाई करू नये

Power Bank Overuse: पॉवर बॅकचा अतिवापर फोनसाठी घातक, वेळीच काळजी घ्या! अन्यथा फोनची बॅटरी...

Nagpur Accident: नागपुरात रस्ते अपघातांत सर्वाधिक मृत्यू दुचाकीचालकांमुळे; ६९ अपघातांत ७८ जणांचा मृत्यू

Girish Mahajan : गिरीश महाजन आणि माणिकराव कोकाटे यांच्यातील प्रशासकीय संघर्ष तीव्र

Pune Crime : पुण्यात वाहतूक पोलिसानं गळफास घेऊन संपवलं जीवन; पत्नीनं अनेक वेळा फोन केला, शाळा सुटल्यावर मुलंही घरी परतली, पण..

SCROLL FOR NEXT