weather update Flood-like conditions Madhya Pradesh heavy rain warning 12 districts of maharashtra  sakal
देश

Rain Update : मध्य प्रदेशात पूरसदृश परिस्थिती; गुजरातलाही झोडपले, बारा जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळसह, ग्वाल्हेर, जबलपूर, रीवा आदी जिल्ह्यांत गेल्या २४ तासांत बहुतांश ठिकाणी पाऊस पडला.

सकाळ वृत्तसेवा

भोपाळ : मध्य प्रदेशात संततधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी रस्तेही वाहून गेल्याने वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. इंदूरमध्ये आज सकाळी तीन तास मुसळधार पाऊस पडला. दरम्यान, गेल्या ३६ तासांमध्ये गुजरातेतही मुसळधार पावसाने हजेरी लावली.

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळसह, ग्वाल्हेर, जबलपूर, रीवा आदी जिल्ह्यांत गेल्या २४ तासांत बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. राज्यातील नरसिंहपूर, उमरिया, सिवनीसह अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

कटनी-बीना रेल्वेमार्गाखालील माती पावसामुळे वाहून गेली. त्यामुळे रेल्वेसेवेवर याचा परिणाम झाला. जबलपूर व नरसिंहपूरमध्ये नर्मदा नदीची पातळी वेगाने वाढत असून आज सकाळी आठ वाजता ती ९४७ फुटांवर पोचली. अवघ्या २४ तासांत पाणीपातळीत दहा फुटांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

येत्या २४ तासांत नर्मदापूरम, भोपाळ, उज्जैन, इंदूर, ग्वाल्हेर, जबलपूर आदी बारा जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातील बाष्पामुळे आणखी दोन-तीन दिवस पावसाची शक्यता आहे.

गुजरातच्या दक्षिण भागालाही गेल्या ३६ तासांत मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे वलसाड, सुरत, नवसारी आणि तापी आदी जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळित झाले. अनेक सखल भाग जलमय झाले तर ग्रामीण भागांतील रस्ते वाहतूकही बंद झाली.

अहमदाबादेतही नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली. वलसाड जिल्ह्यातील पार्डीत सर्वाधिक १८२ मि.मी.पावसाची नोंद झाली. आगामी दोन दिवसांत आणखी पावसाची शक्यता आहे.

प्रमुख ठिकाणचा पाऊस मि.मी.मध्ये (गुजरात)

  • वलसाड १७७

  • पलसाना (जि.सूरत) १७१

  • वालोड (जि.तापी) १६६

  • खेरगाम (जि.नवसारी) १५७

दिल्लीतही वरुणराजा बरसला

दिल्लीकरांची आजची सकाळ मुसळधार पावसाने उजाडली. या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते.

दिल्ली-गुरुग्राम महामार्गावर साचलेल्या पाण्यातून वाढ काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागली. हवामान खात्याने दिल्लीला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

प्रमुख ठिकाणचा पाऊस (मि.मी.)

  • पन्ना २१०

  • पठारी १६०

  • लटेरी १५०

  • दमोह १४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya - Jasmin Walia: हार्दिक - जास्मिन यांच बिनसलं? या घटनेमुळे ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

Pune News : सुनेने दाखल केलेल्या दाव्यातून वगळण्याचा माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह इतरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

जेवताना उचकी लागली, नंतर नाकातून रक्त आलं अन्...; कॉलेजमध्येच विद्यार्थिनीसोबत अघटीत घडलं

DK Shivakumar's Escort Car Overturns: मोठी बातमी! कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट कार महामार्गावर उलटली!

Latest Maharashtra News Updates : पोलिसावर धावून गेला,आळंदीत रिक्षा चालकावर कारवाई

SCROLL FOR NEXT