blood donation Sakal Media
आरोग्य

रक्तदान महादान! जाणून घ्या फायदे..

रक्तदानाचे फायदे कोणते माहित आहेत का?

शर्वरी जोशी

रक्तदानाचं (blood donation) महत्त्व साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळेच रक्तपेढ्या आणि हॉस्पिटल यांच्याकडून वारंवार नागरिकांना रक्तदान करण्यासाठी आवाहन करण्यात येते. आजपर्यंत असे असंख्य जण आहेत जे स्वेच्छेने रक्तदान करतात. त्यामुळेच अशा रक्तदात्यांसाठी आजचा दिवस खास आहे. जे नागरिक रक्तदानासाठी स्वत:हून पुढाकार घेतात, समाजासाठी असलेलं आपलं कर्तव्य ओळखतात अशा रक्तदात्यांचा सन्मान किंवा त्यांचे आभार मानण्यासाठी १४ जून हा जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच, रक्तदान करण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात. ( there-are-so-many-benefits-of-donating-blood)

१. समाधानाची भावना -

रक्तामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात हे साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळेच आपल्या रक्तामुळे एखाद्याचे प्राण वाचले तर ती चांगलीच गोष्ट आहे. म्हणूनच, रक्तदान केल्यानंतर चेहऱ्यावर एक समाधानाचे भाव असतात. त्यामुळे मानसिक समाधान मिळते.

२. निःशुल्क होते रक्त तपासणी -

रक्तदान करण्यापूर्वी आपलं रक्त तपासलं जातं. त्यामुळे आपल्या हिपॅटायटीस बी, एचआयव्ही, हिपॅटायटीस सी, सिफलिस या आजारांच्या रक्तचाचण्याही केल्या जातात. विशेष म्हणजे त्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे भरावे लागत नाहीत.

३. हृदयरोग होण्याची शक्यता कमी होते -

रक्तदानाचा हा सर्वात मोठा फायदा आहे. अभ्यासानुसार असे दिसून आले आहे रक्तदान करणाऱ्या व्यक्तीस हृदयरोगाचा धोका कमी असतो.

४. जादा हानिकारक लोह कमी करते.

५. प्रतिकारशक्ती वाढवते.

६. शरीरातील अतिरिक्त कॅलरीज कमी होतात.

( डॉ. अँनी चुनिया हे सैफी हॉस्पिटल येथे ब्लड बॅंकेचे मुख्य अधिकारी आहेत))

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

Maharashtra Diesel Rules : डिझेल खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडून नियम-अटी जाहीर; शेतकऱ्यांची गैरसोय टळणार

MLC Election: विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत तणाव! शिंदेंनंतर संकटमोचक महाजन दिल्लीला रवाना; कोणत्या जागेवर पेच वाढला?

Junnar Road Crash: डिंगोरे येथे एसटी बस–दुचाकी भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू

KKR vs DC: KL Rahul बरसला! अखेरच्या सामन्यात दिल्लीचे कोलकातासमोर मोठे लक्ष्य; पण शेवट गोड कोण करणार?

SCROLL FOR NEXT