ratvardha8.txt
-------
फोटो-
1) ratvardha10.jpg -KOP23M00891 श्रीदेव खड्गेश्वर
2) ratvardha11.jpg -KOP23M00892 खड्गेश्वर मंदिर
खड्ग अर्पण केलेला म्हणून खड्गेश्वर
कोकणात महाशिवरात्री उत्सव हा उत्साहात साजरा होत असतो. असाच एक उत्सव म्हणजे संगमेश्वर तालुक्यात असलेला देवळे येथील खड्गेश्वराचा. या उत्सवाची शतकोत्तर वाटचाल अखंड सुरू आहे. खड्गेश्वर मंदिर हे बाराव्या शतकातील उत्तर चालुक्यकालिन असल्याचे संदर्भ अनेक ठिकाणी आढळतात. देवस्थान बांधणी, व्यवस्था यासाठी शिवभक्त चालुक्य राजाने आर्थिक पाठबळ दिल्याचे उल्लेख आहेत. या मंदिराबाबत आख्यायिका सांगितली जाते. करकरे नामक ग्रामस्थाची गाय रोज जंगलात एके ठिकाणी जाऊन पान्हा सोडत असल्याचे निदर्शनास आले. करकरे यांनी तिथे खणण्यास प्रारंभ केला तेव्हा काही अंतरावरच त्यांना शिवपिंडी आढळून आली; पण खणताना त्या पिंडीचा वरचा टवका उडाला. आजही खड्गेश्वर मंदिरातील शिवपिंडीचा तो उडालेला टवका स्पष्ट दिसून येतो.
कोल्हापूर येथील शिलाहार वंशातील राजा भोज राज्य करत असताना राजापूरपर्यंत त्याचे राज्य पसरले होते. भोज याचा मुलगा राजपुत्र गंडुरादित्य या भागाचा कारभार पाहात होता. तो 1208 ला या भागात आला असता त्याला या स्वयंभू देवस्थानाचा शोध लागला. राजा भोज याने बल्लाळपंत दीक्षित यांना देवस्थानची जबाबदारी सोपवली. त्यासाठी दीक्षित यांची बावनदी ते मुचकुंदी नदीपर्यंतच्या भागातील अष्टाधिकारी म्हणून नेमणूक केली. या परिसरातील 48 गावांचा कारभार दीक्षित पाहात होते. याच परिसराला देवळे महाल म्हणत असत. पुढे राजा भोज याचे सिंधण राजाबरोबर खिद्रापूरजवळ झालेल्या युद्धात भोजराजाचा पराभव झाला आणि दीक्षित यांचा राजाश्रय सुटला. त्या वेळी बल्लाळपंतांनी आपले खड्ग शंकराला अर्पण केले. तेव्हापासून या शिवमंदिराचे नाव खड्गेश्वर झाले, असा इतिहास सांगतो.
हे मंदिर पूर्वाभिमुख असून, मंदिरात दीपमाळा आहेत. मंदिरात दगडी पोवळी आहेत. लाकडी कोरीव काम केलेले खांब आहेत. मध्यभागी भव्य सभामंडप आहे तसेच गावाच्या परिसरात युद्धे झाल्याच्या खुणा म्हणून उभारण्यात आलेल्या वीरगळी आता मंदिरात आणून ठेवण्यात आल्या आहेत.
खड्गेश्वर मंदिरातील शिवरात्रोत्सव तालुक्यात प्रसिद्ध आहे. हा उत्सव सहा दिवस चालतो. आरत्या, छबिना, कीर्तन असे पारंपरिक कार्यक्रम आखण्यात येतात. उत्सवकाळात श्रींची मूर्ती पालखीत ठेवून देवळाभोवती प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. शिवरात्रीला उत्सव संपूर्ण रात्र रंगतो आणि त्या दिवशी तांदळाची महापूजा बांधण्यात येते.
- अमित पंडित
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.