कोकण

खेडमध्ये पंचनाम्यांसाठी २१ कृषी सहाय्यक नियुक्त

CD

३३ (पान ३ साठी)

खेडमध्ये पंचनाम्यांसाठी २१ कृषी सहाय्यक
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २१ : तालुक्यासह ग्रामीण भागात चार दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा तडाखा घरांसह शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी दिले आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या फळझाडे व फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी १६ कृषी सहाय्यकांसह ५ कृषी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा सर्वाधिक तडाखा महावितरणला बसला असून २० लाखाच्या आसपास हानी झाली आहे. याशिवाय शहरासह ग्रामीण भागात घरांसह गोठ्यांची पडझड झाली असून २० लाखाहून अधिक हानी झाली आहे. शहरासह तालुक्यातील सुकिवली, भोस्ते, चाकाळे येथील घरांची सर्वाधिक नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मंडळ अधिकारी व तलाठी यांना देण्यात आले असून काम सुरू आहे. मात्र अद्याप घरांच्या नुकसानीचा आकडा प्राप्त झालेला नाही. वादळी वाऱ्याचा तडाखा शहरासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना देखील बसला आहे. विशेषतः बागायतदारांच्या आंबा बागायती उद्ध्वस्त झाल्या असून मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्यामुळे आंबा बागायतदार चिंतेच्या गर्तेत अडकले आहेत. तीन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस संततधार पडत असल्याने शेतकऱ्याची चिंता कायम आहे. या पार्श्व‍भूमीवर फळझाडे व फळबागांचे पंचनामे करण्यासाठी २१ अधिकारी व कृषी सहाय नियुक्ती करण्यात आले आहेत. पंचनाम्याचे काम देखील सहाय्यकांकडून हाती घेण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT