कोकण

खरवतेमध्ये आपत्तीपासून संरक्षणाबाबत जनजागृती

CD

-rat३१p२९.jpg-
P२४N२२४५३
राजापूर ः नैसर्गिक आपत्तीसंबंधी खरवते ग्रामपंचायतीच्या वतीने गाडी फिरवून जनजागृती करण्यात येत आहे.
------------

आपत्तीपासून संरक्षण संबधी जनजागृती

खरवतेमध्ये माझी वसुंधरा अभियान ; पर्यावरणदुतांचे मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३१ ः गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्‍या परतीच्या पावसामध्ये तालुक्यामध्ये वीज पडून नुकसान होण्याच्या घटना घडल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण होण्याच्यादृष्टीने तालुक्यातील खरवते ग्रामपचायतीच्यावतीने आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिनानिमित्ताने जनजागृती करण्यात आली. माझी वसुंधरा अभियानांतर्गंत घेण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये पर्यावरणदूत भास्कर गुरसाळे यांनी नैसर्गिक आपत्तीच्या काळात कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.
नैसर्गिक आपत्ती निवारण जनजागृतीबाबत झालेल्या मार्गदर्शन कार्यक्रमावेळी खरवतेचे सरपंच अभय चौगुले, उपसरपंच गौरव सोरप, ग्रामसेविका नेहा कुडाळी आणि ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
निसर्गातील पंचतत्त्वातील संतुलन बिघडल्यामुळे नैसर्गिक आपत्तीचा धोका निर्माण होतो. त्यातून, चक्रीवादळ, वीज पडणे, सुनामी लाटा, भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्ती निर्माण होवून मोठ्या प्रमाणात विविध स्वरूपाची हानी होते. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. तीन ठिकाणी वीज पडल्याचीही घटना घडल्या आहेत. त्यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी घरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाळ्यामध्ये वारंवार जमीन खचणे, डोंगराला भेगा पडणे, पूरस्थिती यांसारख्या घटना सातत्याने उद्भवत आहेत. या साऱ्‍या नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने खरवते ग्रामपंचायतीच्यावतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गंत लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
---
`ऑडिओ क्लीप’द्वारे सूचना

नैसर्गिक आपत्ती रोखताना निसर्गाचा समतोल ढासळू नये म्हणून उपाययोजना करणे गरजेचे आहे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसान होवू नये वा स्वसंरक्षणासाठी कोणती काळजी घ्यावी यासंबंधी पर्यावरण दूत श्री. गुरसाळे यांनी मार्गदर्शन केले. त्याचवेळी ऑडीओ क्लिपद्वारे शासनाच्या आपत्ती व्यवस्थापनबाबतच्या मार्गदर्शक सूचनाही गावामध्ये फिरून ठिकठिकाणी ऐकविण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khandala : सातारा-पुणे मार्गावर भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक, ट्रकचालक फरार

रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक फिस्कटले! हुतात्मा, वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरला वेळेत, पण दक्षिणेकडे जाणाऱ्या ‘या’ गाड्या २ ते ३ तासांनी धावताहेत उशिराने

Nanded Drug Seizure : शिवणीत तुरीच्या ताशेत लपवलेला ‘गांजा’ उघड; पोलिसांची धाड, ₹1.60 लाखांचा मुद्देमाल जप्त!

Dhule News : उभा केलेला ट्रॅक्टर उतारावरून मागे सरकला अन् विहिरीत कोसळला; ३ वर्षीय दोन मुली बुडाल्या, एकीला वाचवलं

मोठी बातमी! ३५ हजार शिक्षकांचा कापला जाणार एक दिवसाचा पगार; आंदोलनावेळी बंद राहिल्या राज्यातील २४ हजार शाळा; आता ९ अन्‌ १२ तारखेला नागपूरमध्ये आंदोलन

SCROLL FOR NEXT