कोकण

अभ्यंकर महाविद्यालयाचे पोस्टर मेकींगमध्ये यश

CD

अभ्यंकर महाविद्यालयाचे
‘पोस्टर मेकिंग’मध्ये यश

रत्नागिरी ः कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान (मुंबई) व अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वन्य जीव सप्ताह साजरा केला. यात आयोजित पोस्टर मेकिंग स्पर्धेत अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. वन्यजीव सप्ताहामध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण कांदळवन एक वरदान या विषयावर आधारित पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत ३८ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यामधून यश राजकुमार चव्हाण याने प्रथम क्रमांक, अनुष्का धामणे हिने द्वितीय तर भक्ती दिनकर आंबेकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे नियोजन महाविद्यालयाच्या पर्यावरण मंडळातर्फे करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी आणि संस्थेचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
-----
- rat३१p२२.jpg
२४N२२४४३
- पं. चंद्रशेखर वझे
---------
चिपळुणात उद्या
दिवाळी पहाट

चिपळूण : रोटरी क्लब व सहजयोग परिवार चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे २ नोव्हेंबरला पहाटे साडेसहा वाजता दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळी पहाटमध्ये पं. चंद्रशेखर वझे आपल्या गायनाने चिपळूणवासियांना मंत्रमुग्ध करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांना विनामूल्य आहे. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन रोटरी क्लब चिपळूण व सहजयोग परिवार चिपळूण यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
------

पालेकोंडमध्ये उद्या
संस्कारांचा दीपोत्सव

मंडणगड ः स्व. सुरेखाबाई सहदेव माळी यांचे पुण्यस्मरण करीत आईचा स्मृतिगंध जपण्यासाठी पाले येथील माळी कुटुंबीयांच्या वतीने २ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता संस्कारांचा दीपोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने (कै.) भिकू गंगाराम माळी चौक पालकोंड रंगमंच येथे गायक दीप जोशी यांचा अमृताचे तिर्थ चरणी हा लाईव्ह गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचबरोबर शांताराम पवार यांचे आईचा जीवन प्रवास या विषयावर व्याख्यान होणार आहे. यानंतर जाखडी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुकावासीयांनी सर्व कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन सुनील माळी, सचिन माळी, अमित माळी, विनायक हंबीर व माळी कुटुंबीय यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ३५ हजार शिक्षकांचा कापला जाणार एक दिवसाचा पगार; आंदोलनावेळी बंद राहिल्या राज्यातील २४ हजार शाळा; आता ९ अन्‌ १२ तारखेला नागपूरमध्ये आंदोलन

Dhule News : उभा केलेला ट्रॅक्टर उतारावरून मागे सरकला अन् विहिरीत कोसळला; ३ वर्षीय दोन मुली बुडाल्या, एकीला वाचवलं

Khandala : सातारा-पुणे मार्गावर भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक, ट्रकचालक फरार

Indigo Crisis : ६१० कोटी दिले रिफंड, ३ हजार बॅग्जही पोहोचवल्या; आज इंडिगोच्या १६५० विमानांचं उड्डाण

Mangalwedha News : खरीप ते रब्बी; प्रत्येक हंगामात दुबार पेरणी; शेतकऱ्यांच्या व्यथेला शासनानं कधी दाद द्यायची!

SCROLL FOR NEXT