-rat३१p२०.jpg -
P२४N२२४४१
गुहागर ः शहीद जवानांसाठी एक दिवा लावून गुहागरवासीयांना त्यांना आदरांजली वाहिली.
-----------
भारतीय जवानांप्रती गुहागरवासीयांची कृतज्ञता
गुहागरमध्ये उपक्रम ; एक दिवा शहिदांसाठी
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ३१ : शहीद झालेल्या भारतीय जवानांना तसेच सीमेवर लढणाऱ्या आणि कुटुंबापासून दूर राहून कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता आणि संवेदना व्यक्त करण्यासाठी प्रतीवर्षा प्रमाणे यावर्षीही शिवतेज फाऊंडेशन आणि समस्त गुहागरवासीयांच्या वतीने दीपावलीच्या पूर्वसंध्येला (धनत्रयोदशी) संध्याकाळी ७ वाजता गांधी चौक येथे एक दिवा शहिदांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
टीव्ही किंवा वर्तमानपत्रात बातम्या पाहून केवळ हळहळ व्यक्त न करता आम्ही गुहागरवासीय, जवानांप्रती असलेली कृतज्ञता व संवेदना व्यक्त करण्यासाठी कोणतेही राजकीय व सामाजिक अभिनिवेश न बाळगता एकत्र येतो ही बाब गुहागरवासीयांनी प्रत्येक वर्षी कृतीतून दाखवून दिली आहे. या उपक्रमाचे हे अकरावे वर्ष आहे. यावर्षी देखील मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबीयांसोबत व मित्रपरिवारासहित या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थिती लावली. या उपक्रमासाठी खास भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक प्रतापराव शिर्के आणि निलेश नाना पाटील यांची उपस्थिती होती. त्यांनी काही किस्से सांगून नागरिकांच्या अंगावर शहारे आणले. संपूर्ण गांधी चौक दिव्यांनी प्रकाशमान झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड. संकेत साळवी, राजेंद्र आरेकर, नीलेश गोयथळे, संतोष वरंडे, गणेश धनावडे आदींनी मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.