रघुनाथ कदम, आचरेकर प्रतिष्ठानचा
गोव्यात ७ जानेवारीला होणार गौरव
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ११ः स्वामीराज प्रकाशन या संस्थेने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहयोगाने मुंबईत ७ जानेवारीला एकल नाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. मुंबई, पुणे, जळगाव, अहिल्यानगर आणि गोवा येथील आठ नाटके या महोत्सवात सादर होणार आहेत. याच महोत्सवात दोन व्यक्ती व दोन संस्थांना पुरस्कारही देण्यात येणार आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ दिग्दर्शक रघुनाथ कदम तसेच कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान या संस्थेचाही समावेश आहे.
माहीम येथील यशवंत नाट्य मंदिर येथे ७ जानेवारीला सकाळी १० ते रात्री ११ पर्यंत दिवसभर हा महोत्सव होणार आहे. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक रघुनाथ कदम यांना (कै.) सुभाष घोरपडे स्मृती ‘सेवाव्रती’ पुरस्कार, तर नाशिक येथील लेखक, दिग्दर्शक दत्ता पाटील यांना (कै.) अतुल परचुरे स्मृती ‘रंगसेवा’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. गेली ३८ वर्षे बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या रविकिरण मंडळाला (कै.) ज्योतिराम कदम स्मृती ‘धुळाक्षर’ पुरस्कार, तर गेली ४८ वर्षे विविध उपक्रम राबविणाऱ्या कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान या संस्थेला प्रबोधन प्रयोग घर, कुर्ला पुरस्कृत ‘प्रयोग घर’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या महोत्सवात सादर होणारी एकल नाट्य पुढीलप्रमाणे : ‘सांगत्ये ऐका’ (आविष्कार, मुंबई), ‘द डिसीजन’ (कादव, अहिल्यानगर), ‘शक्तिमानने स्कर्ट का घातलाय’ (नाटक दहा बाय वीस, मुंबई), ‘स्टोअर रुमचे काय झाले’ (हिमशिखा, पुणे), ‘नली’ (परिवर्तन, जळगाव), ‘कुकुचकू’ (भोळे निर्मित, पुणे), ‘यात्रा’ (चक्री, पुणे), ‘मूक आक्रोश’ (थिएटर फ्लेमिंगो, गोवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.