५२०४३
‘चिपी’तून लवकरच मुंबई फेरी
नारायण राणे ः केंद्रीय विमान वाहतूकमंत्र्यांशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता. १८ : चिपी विमानतळावर लवकरच अलायन्स एअर सेवा पुन्हा सुरू होणार आहे. नागरी विमान वाहतूकमंत्री के. राममोहन नायडू यांनी याबाबत विशेष योजना अंमलात आणण्यात येईल, असे खासदार नारायण राणे यांना आश्वासित केले. गेले काही महिने चिपी विमानतळ ते मुंबई ही नियमित सुरू असलेली सेवा बंद होती. ती पुन्हा मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई अशी सुरू करण्यासाठी उड्डाण संचालनालयाने विशेष धोरण अंमलात आणावे यासाठी राणे आग्रही आहेत.
खासदार नारायण राणे यांनी नागरी विमान वाहतूकमंत्री के. राम मोहन नायडू, तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेत सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा किती महत्त्वाची आहे, तसेच विमानतळावरील अन्य सेवा, सुविधांकडे लक्ष वेधले. सिंधुदुर्ग जिल्हा हा मूळ समुद्रकिनारे, विपुल नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक-धार्मिक स्थळे आणि विदेशी खाद्यपदार्थांसह पर्यटकांचे देशव्यापी, तसेच आंतरराष्ट्रीय आवडते ठिकाण आहे. भारत सरकारने या पार्श्वभूमीवर प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना किंवा उडाणमध्ये समाविष्ट करण्यासाठी सिंधुदुर्ग विमानतळाची निवड केली. अलायन्स एअरने मुंबई-सिंधुदुर्गा-मुंबई दरम्यान उड्डाणे सुरू केली. ‘आरसीएस’चा कालावधी ३ वर्षांचा होता, जो ऑक्टोबर २०२४ मध्ये संपला. उड्डाण सेवा थांबवल्यामुळे जिल्ह्याच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवर तसेच एअरलाइन वापरकर्त्यांवर वाईट परिणाम झाला आहे. मुंबई ते चिपी सेवा कार्यान्वित असताना पर्यटकांना, जिल्हावासीयांना मोठा लाभ होत होता. पर्यटक, स्थानिक प्रवासी आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला मिळणारी उभारी लक्षात घेता सिंधुदुर्गासाठी आरसीएस आणखी पाच वर्षांसाठी वाढवावी, सिंधुदुर्गासाठी अलायन्स एअर सेवा पुन्हा सुरू करावी, अशी भूमिका श्री. राणे यांनी स्पष्ट केली. याबाबत लवकरच ही सेवा सुरू करण्याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी आश्वस्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.