कोकण

भाजपच्या मंडणगड तालुक्याध्यक्षपदी प्रवीण कदम

CD

-Rat२१p२२.jpg
P25N59032
ः मंडणगड: अध्यक्षपदी निवड झालेल्या प्रवीण कदम यांचे अभिनंदन करताना निरीक्षक श्रीराम इदाते, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश शिगवण, माजी तालुकाध्यक्ष अप्पा मोरे.
-----------
भाजपचे मंडणगड तालुक्याध्यक्ष
प्रवीण कदम यांचा सत्कार
मंडणगड, ता.२१ ः भारतीय जनता पार्टीचे मंडणगड तालुक्याचे अध्यक्षपदी लाटवण येथील युवा कार्यकर्ते प्रवीण कदम यांची निवड झाली आहे. भाजपच्या संघटन पर्वामध्ये पूर्ण महाराष्ट्रात संघटनात्मक निवडणूका होत आहेत. मंडल अध्यक्षांच्या निवडी झाल्या आहेत. याचाच एक भाग मंडणगड (मंडल) तालुक्यात मंडल अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. या वेळी माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मण मोरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश शिगवण, निवडणूक अधिकारी श्रीराम इदाते व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंडल अध्यक्षासाठी अनेक नावे पक्षाकडे कार्यकर्त्यांनी सुचवलेली होती, असे भाजप जिल्हा महामंत्री व निवडणूक अधिकारी श्रीराम इदाते यांनी निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सांगितले. प्रदेशकडून होकार आल्याने कदम यांची निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी इदाते यांनी सांगितले. नवनिर्वाचित मंडणगड मंडल अध्यक्ष कदम यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी वरिष्ठ भाजप कार्यकर्त्यांच्या सहकार्याने नक्कीच पक्षवाढीसाठी व मंडणगडच्या विकासासाठी काम करणार असल्याचे निवडीनंतर सांगितले.
----
कोणतीही नाराजी नाही
निवड प्रक्रियेनंतर स्थानिक पातळीवरील समाजमाध्यमात नाराजीच्या सुरू असलेल्या बातम्या निरर्थक असून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्यास एक कार्यकर्ता म्हणून पूर्ण करण्यास मी सदैव तत्पर असल्याची प्रतिक्रिया माजी तालुकाध्यक्ष अप्पा मोरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुखापत झालेल्या शाहरुखला काही झालं तर इंडस्ट्रीसोबतच 'या' लोकांचंही दिवाळं निघेल; एकूण इन्व्हेस्टमेंट किती माहितेय?

Viral Video: शंभर रुपयात तीन पोरं, डील फिक्स! सायकल सोडून तिघांनी शेतात ठोकली धूम; व्हिडीओ तुफान व्हायरल

Latest Maharashtra News Updates : अहिल्यादेवी होळकर यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट

W,W,W,W,W! १७ वर्षीय फरहान अहमदची विक्रमी कामगिरी, हॅटट्रिकसह घेतल्या ५ विकेट्स

Crime: घोरपडीच्या गुप्तांगाची विक्री, ज्योतिषी अटकेत, नेमकं प्रकरण काय? घटना वाचून डोकं चक्रावेल

SCROLL FOR NEXT