59881
स्मार्ट वीज मिटरची सक्ती तर चोप
शिवसेना ठाकरे गटाचा इशारा; कणकवलीत महावितरणचे अभियंते धारेवर
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.२५ : जिल्ह्यातील ग्राहकांना स्मार्ट वीज मिटरची सक्ती करू नका. यापुढे जर ग्राहकांना न विचारता स्मार्ट वीज मिटर बसविण्यात आले तर शिवसेना स्टाईलने चोप देऊ, असा इशारा शिवसेना ठाकरे पक्ष पदाधिकाऱ्यांनी महावितरण अभियंत्यांना दिला.
शहरात ठिकठिकाणी स्मार्ट वीज मिटर बसविण्यात येत आहेत. त्याविरोधात आक्रमक झालेल्या शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री तारापूरे आणि कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांची महावितरण कार्यकारी अभियंता कार्यालयात भेट घेतली. यावेळी ग्राहकांच्या संमतीशिवाय
स्मार्ट मीटर बसविणार नाही असे लेखी पत्र द्या अशी मागणी श्री.नाईक यांनी केली. त्यानंतर एनर्जी सोल्युशन अहमदाबाद या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज ग्राहकांच्या संमती शिवाय स्मार्ट मीटर न बसविण्याचे पत्र महावितरणच्या कणकवली कार्यकारी अभियंत्यांना दिले.
सतीश सावंत म्हणाले, शासनाने आता कृषी पंपाऐवजी सौर कृषीपंपाची सक्ती केली आहे. सिंधुदुर्गात वृक्षसंपदा मोठी आहे. तर पाच ते सहा महिने पाऊस असतो. त्यामुळे सावली आणि पावसाळी कालावधीत सौर कृषीपंप चालणार नाहीत. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे विजेवर चालणारेच कृषी पंप शेतकऱ्यांना द्यावेत.’’ ‘‘पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी आतापासूनच कार्यवाही करा. वीज वाहिन्यांवरील झाडी तोडण्याचे काम तातडीने पूर्ण करा, विद्युत खांब, वाहिन्या बदलणे, ट्रान्स्फार्मर बदलणे आदी कामे पूर्ण करा,’’ अशी मागणी संदेश पारकर यांनी केली.
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर,तालुका संघटक राजू राठोड, शहरप्रमूख रुपेश नार्वेकर, राजू शेटये, महेश कोदे, बंडू चव्हाण, अनुप वारंग, माधवी दळवी, संजना कोलते, दिव्या साळगावकर, धनश्री मेस्त्री,प्रतिभा अवसरे, अजय सावंत, योगेश मुंज, अजित काणेकर, वैभव मालंडकर, संतोष पुजारे, रोहित राणे, नितीन राऊळ, अरुण परब, रामा राणे, लक्ष्मण हन्नीकोड, बाबू केणी, रवी परब, उद्धव पारकर, सार्थक ठाकूर आदी उपस्थित होते.
----
शहरात मिटर बसवताच संताप
शहरातील बांधकरवाडी येथील दत्तदर्शन अपार्टमेंटमधील १८ ग्राहकांचे जुने वीज मिटर बदलून तेथे नवीन स्मार्ट वीज मिटर बसविले. याच धर्तीवर परबवाडी येथील कामत सृष्टीमधील ५० सदनिका धारकांचे वीज मिटर बदलून तेथे स्मार्ट मिटर बसविले. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात धडक दिली. यावेळी तेथे उपस्थित असलेले महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री.तारापुरे आणि कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांच्याशी चर्चा करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.