60036
‘स्टेपिंग स्टोन ग्लोबल’मध्ये
हाऊस कप्तान-उपकप्तान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थी उमेदवारांच्या निवडणुका घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांची वर्तणूक व शैक्षणिक गुणवत्ता यांचे मूल्यांकन करून विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रमुख तसेच प्रत्येक हाऊसचे कप्तान व उपकप्तान म्हणून उमेदवारी देण्यात आली.
विद्यार्थी प्रमुख ः सातवी-तनिष्क पवार, हेरंभ नाटेकर, विद्यार्थिनी प्रमुख साईना अळवणी, स्पृहा आरोंदेकर यांना उमेदवारी देण्यात आली. या विद्यार्थ्यांना विशिष्ट चिन्हे दिली गेली. प्रत्येक हाऊसचे कप्तान व उपकप्तान असे ः ‘अग्नी’ हाऊस कप्तान-भुवन दळवी व प्रत्युशा घोगळे (सहावी), उपकप्तान-वरद राणे, कुशल तांडेल (पाचवी). वायू हाऊस कप्तान-देवांग सारंग, भूमी नाणोस्कर (सहावी), उपकप्तान-वरद सावंत, जान्हवी सावंत (पाचवी), पृथ्वी हाऊस कप्तान-नील सावंत, अवनी शेर्लेकर (सहावी), उपकप्तान-कविश पेडणेकर, सई नाईक (पाचवी), जल हाऊस कप्तान-कॅल्व्हर्ट फर्नांडिस, आरोही सावंत (सहावी), उपकप्तान-रुद्र मालवणकर, अनिका सुकी (पाचवी). यावेळी विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया समजावण्यात आली. या मतदान प्रक्रियेत अधिकारी म्हणून क्रीडाशिक्षक शैलेश नाईक, शालेय निवडणूक प्रमुख प्रशालेतील समन्वयक सुषमा पालव व मुख्याध्यापिका प्राची साळगावकर यांनी कामगिरी बजावली. शाळेचे संचालक रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका साळगावकर यांनी या निवडणूक प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.