78803
समाजकारणात राजकारणाला थारा नाही
नीतेश राणे; कुडाळमध्ये भंडारी समाजातर्फे गुणगौरव सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २० ः जिल्ह्याचा विकास एकत्र येऊनच झाला पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भंडारी समाज भवन आणि वसतिगृह उभारण्यासाठी माझे सर्वतोपरी सहकार्य राहील. तुम्ही केवळ जागा निश्चित करा, वर्षभरात ही सुसज्ज वास्तू उभी करून देण्याची जबाबदारी माझी आहे, अशी ग्वाही मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे यांनी केले.
कुडाळ तालुका भंडारी समाज आयोजित भंडारी समाज मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा आज येथील सिद्धिविनायक हॉलमध्ये पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री राणे बोलत होते. व्यासपीठावर अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, जिल्हाध्यक्ष हेमंत करंगुटकर, कुडाळ तालुकाध्यक्ष अतुल बंगे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हाध्यक्ष मामा माडये, रुपेश पावसकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष राजू किर, पांडुरंग मायनाक, शलाखा पांजरी, सचिव शरद पावसकर, एकनाथ टेमकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेविका आफरीन करोल, श्रेया गवंडे, ज्योती जळवी, भंडारी समाज युवा जिल्हाध्यक्ष समील जळवी, गजानन वेंगुर्लेकर, विजय कांबळी, राजन कोरगावकर आदी उपस्थित होते.
श्री. बांदिवडेकर यांनी, विद्यार्थी हे सिंधुदुर्गचेच नव्हे तर देशाचे भवितव्य आहात. इच्छाशक्ती ठेवून यशस्वी जीवनाकडे वाटचाल करा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि समाजाला साजेसे काम करा, असे आवाहन केले. श्री. बंगे यांनी, या कार्यक्रमाला पालकमंत्री राणे यांनी व्हॉटसअॅपवरील निमंत्रणाने येण्याला होकार दिला, यावरून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. भंडारी समाजाच्या समस्या त्यांना समजाव्यात, यासाठीच त्यांना निमंत्रित केले, असे सांगितले. तालुकाध्यक्ष बंगे यांनी प्रास्ताविक केले. नागेश नेमळेकर व बादल चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.
---
अतुल बंगे यांच्यासोबत जुनी मैत्री
पालकमंत्री राणे म्हणाले, ‘‘अतुल बंगे आणि माझी ओळख व मैत्री जुनी आहे. आमची मैत्री राजकारणापलीकडची आहे. ते त्यांच्या पक्षाचे काम करतात, मी माझे काम करतो. मात्र, आम्ही आमच्यातील मैत्री जोपासली आहे. हेच सर्वांनी केले पाहिजे. माझा या जिल्ह्यात कोणीही शत्रू नाही. जिल्ह्याचा विकास एकत्र येऊनच झाला पाहिजे. आज बंगे यांचा आमच्यासोबत असलेल्या मैत्रिपूर्ण संबंधाचा फायदा जिल्ह्याला आणि भंडारी समाजाला होईल, यात शंका नाही. भंडारी समाज हा प्रामाणिक आणि निष्ठा ठेवणारा, दिलेला शब्द न मोडणारा असा आहे. या समाजातील गुण आणि प्रेरणा घेण्यासारखी आहे. या समाजातील मायनाक भंडारी यांचे कार्य मोठे आहे. या जिल्ह्यात भंडारी समाज भवन व वसतिगृह उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य राहील.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.