swt1735.jpg
92273
मालवणः एमआयटीएम महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हा व सत्र न्यायाधीश अवधूत देशिंगकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
रॅगिंगला निर्भयपणे प्रत्युत्तर द्या
अवधूत देशिंगकरः एमआयटीएम महाविद्यालयात मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १७ : रॅगिंगबाबत आता कायदा विद्यार्थ्यांच्या बाजूने आहे. दुर्बलांसाठी हा कायदा ठामपणे उभा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निर्भयपणे न्याय मागावा, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश अवधूत देशिंगकर यांनी सुकळवाड एमआयटीएम महाविद्यालय येथे केले.
जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट अभियांत्रिकी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार रॅगिंगविरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश देशिंगकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंगचे गंभीर परिणाम आणि त्याबद्दलच्या कायद्याची माहिती दिली. रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर आणि समाजावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांवर भर दिला.
ते म्हणाले, ‘‘रॅगिंग हा एक गंभीर गुन्हा असून त्यामुळे केवळ पीडित विद्यार्थ्यालाच नव्हे, तर रॅगिंग करणाऱ्याच्या आयुष्यावरही त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. जर एखाद्या विद्यार्थ्याने रॅगिंग केल्याचे सिद्ध झाले तर त्याला तातडीने महाविद्यालयातून काढून टाकले जाऊ शकते. याशिवाय त्याला पुढील पाच वर्षांसाठी कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही. रॅगिंगच्या गुन्ह्यासाठी दोन वर्षांची न्यायालयीन कोठडी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा कायद्यात आहे. शासकीय सेवेत नोकरी मिळवतानाही अशा विद्यार्थ्यांना अडचणी येऊ शकतात.’’
या कार्यक्रमादरम्यान न्यायाधीशांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे महत्त्व सांगितले. एमआयटीएम चे प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल यांनी न्यायाधीश देशिंगकर यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला लोक अभिरक्षक ॲड. श्वेता तेंडुलकर, लिपिक श्वेता सावंत तसेच कॉलेजचे डिप्लोमा प्राचार्य विशाल कुशे, उपप्राचार्य पूनम कदम, प्रशासकीय अधिकारी राकेश पाल, सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन अश्विता जाधव यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, उपाध्यक्ष विनोद कदम, सेक्रेटरी नेहा पाल, खजिनदार वृषाली कदम आणि संस्थेचे विश्वस्त केतन कदम यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.