rat24p7.jpg
00143
रत्नागिरी - दिवाळीतही अविरत सेवा देत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मंडणगड तालुक्यातील खंडित विद्युतपुरवठा सुरळीत केला.
rat24p8.jpg-
00144
बाणकोट येथील महावितरण कंपनीची टीम.
-----------------
महावितरण कर्मचाऱ्यांची दिवाळीतही अविरत सेवा
मंडणगडमध्ये पावसाचा कहर ; २१ गावे अंधारत, २१ तासांत वीजपुरवठा पूर्ववत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : दिवाळीचा उत्सव सर्वत्र साजरा होत असताना जिल्ह्यातील मंडणगड महावितरण उपविभागात मात्र पावसाने कहर केला होता. २१ ऑक्टोबरला आलेल्या मुसळधार पावसासोबत जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे मंडणगड विभागातील केळशी, बाणकोट आणि देवारे शाखांतील २१ गावे अंधारात गेली होती. या आपत्तीत ३३ केव्ही केरील फीडर ब्रेकडाऊन झाल्याने वीजपुरवठा पूर्णपणे बाधित झाला होता. याच दिवशी लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त होता. अनेकांनी आपल्या घरी दिवाळीचा प्रकाश पेटवला; पण मंडणगड उपविभागातील महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र ग्राहकांच्या घरांमध्ये प्रकाशाचा दीप जळावा म्हणून रात्रंदिवस पावसात भिजत काम करत होते.
महावितरण टीमने तातडीने पर्यायी ११ केव्ही लाईनवरून वीजपुरवठा सुरू करण्याचे काम अवघ्या २-३ तासांमध्ये केले. त्यामुळे २१ गावांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात सुरू केला. नागरिकांना ऐन सणासुदीच्या काळात काहीसा दिलासा मिळाला. तथापि, मुख्य ३३ केव्ही केरील फीडर सुरू करणे, ही खऱ्या अर्थाने एक आव्हानात्मक जबाबदारी होती. पावसाच्या संततधारेत आणि खडतर परिस्थितीत काम करताना १५ इन्सुलेटर बदलण्यात आले. अखेर २१ तासांच्या अथक मेहनतीनंतर ३३ केव्ही फीडर पूर्ववत करण्यात आला आणि संपूर्ण भागाचा वीजपुरवठा सुरळीत झाला.
महावितरणच्या मंडणगड उपविभागातील या कर्मचाऱ्यांनी दाखवलेले धैर्य, समर्पण आणि तत्परता हे खरोखरच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात कोकण परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांनी कौतुक केले. या कामी बाणकोट शाखेचे अभियंता अनिकेत खोंड यांच्या नेतृत्वाखाली प्रभाकर मांडवकर, हर्ष मांडवकर, रोहन दुर्गावले, संकेत पार्टे, अमोल कोळंबेकर यांच्यासह देवारे शाखेचे सुरज माळी, प्रितेश कांचावडे, केशव बोथरे, अमर पवार, शशिकांत लोंढे, धीरज कदम व केळशी शाखेचे शरद गीते, विपुल जाधव, राकेश बामणे यांच्यासह इतर कर्मचारी व जनमित्रांनी एकत्र येत वीजपुरवठा सुरळीत केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.