कोकण

वात्सल्य मंदिरचा जडणघडणीत मोठा वाटा

CD

-rat२५p१७.jpg-
२५O००४२०
राजापूर ः दीपावली स्नेहमेळाव्यामध्ये पोलिस उपनिरीक्षक अभय तेली यांची प्रकट मुलाखत घेताना बी. के. गोंडाळ. शेजारी डॉ. महेंद्र मोहन.
-----
वात्सल्य मंदिरचा जडणघडणीत मोठा वाटा
पोलिस उपनिरीक्षक अभय तेली : राजापूरमध्ये प्रकट मुलाखत
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ ः ‘मी ओणी येथील वात्सल्य मंदिराच्या बालकाश्रमात पाचवीमध्ये आई-वडील नसलेला निराधार बालक म्हणून दाखल झालो. सुरुवातीला मी अभ्यासात खूपच कच्चा होतो; पण वात्सल्य मंदिरचे अध्यक्ष डॉ. महेंद्र मोहन, आशाताई, देवेंद्र गुजर, अधीक्षिका सुवर्णाताई यांचा माझ्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. हीच माझी दैवते आहेत. त्यांनी लावलेली शिस्त माझ्या जीवनात क्षणोक्षणी उपयोगी ठरली,’ असे उदगार रत्नागिरीचे पोलिस उपनिरीक्षक अभय तेली यांनी काढले.
राजापूर इंग्लिश मीडियमच्या आंबेवाडी येथील सभागृहात दिशा परिवारच्या राजापूर विभागाचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. या वेळी पोलिस उपनिरीक्षक अभय तेली आरास अ‍ॅकॅडमीचे संचालक राकेश सातवे, राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह प्रकाश भावे, जी. आर. कुळकर्णी, संदीप देशपांडे, सुगंधा रानडे, दीपक नाटेकर आदी उपस्थित होते.
दिशा परिवारचे राजापूरचे समन्वयक गजानन जोशी आणि अनंत रानडे यांच्या हस्ते अभय तेली यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर बी. के. गोंडाळ यांनी अभय तेली यांची मुलाखत घेतली. श्री. तेली म्हणाले, स्वप्नपूर्तीसाठी जिद्द, कष्ट, मेहनतीशिवाय पर्याय नाही. यासाठी आपले कर्म चांगले ठेवा. आपल्या निवडलेल्या क्षेत्रात झोकून देऊन अभ्यास करा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. ओणी हायस्कूलमध्ये माझ्या अभ्यासाचा पाया घातला गेला. मी सुमारे पन्नास मॅरेथॉन स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यातून मिळालेला पैसा माझ्या शिक्षणासाठीच वापरला. जबरदस्त आत्मविश्वासामुळे मी पोलिस, कमांडो, तहसीलदार, सेट-नेट, पोलिस उपनिरीक्षक यांच्या परीक्षा पास झालो. याप्रसंगी पुणे येथील दिशा परिवाराच्या तालुक्यातील शिष्यवृत्तिधारक विद्यार्थी, पालक आणि मदतीचा हात देणारे दाते यांनी स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून एकत्रितरीत्या दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Railway Ticket: एआय तिकिटांचा सुळसुळाट! विशेष स्क्वॉड तैनात, बनावट तिकीट आढळल्यास ७ वर्षांचा तुरुंगवास अन्...; रेल्वेची मोठी मोहीम

Akola : गावच्या पाण्याच्या टाकीतून थेट घराला आणि शेतीला पाणी नेलं, १५ वर्षे पाणीचोरी; ठाकरेंच्या नेत्यावर गुन्हा दाखल

झी मराठीवर येतेय नवी मालिका 'शुभ श्रावणी'; दोन बड्या कलाकारांचं कमबॅक; पण आताही ओरिजनल नाहीच, प्रोमो पाहिलात?

Crime: सून सतत मोबाईवर व्यस्त; सासरे अन् दिराने फोन हिसकावला, संतापून महिलेचं धक्कादायक कृत्य, काय घडलं?

खांद्यावर पदर, सिंपल लूक अन् गुलाबी ग्लो, महाराष्ट्राची वहिनी जेनिलियाचा लूक पाहिला का? रितेशसोबतचा हटके Viral Video

SCROLL FOR NEXT