कोकण

हर्णै बंदरात लाखोंची उलाढाल

CD

-rat२५p२०.jpg-
P२५O००४२३
दापोली ः हर्णै बंदरात शनिवारी चिमणी बाजारात मासळी खरेदीसाठी पर्यटकांनी केलेल्या गर्दीला जत्रेचे स्वरूप आले होते.
-rat२५p२१.jpg-
P२५O००४२४
ताजी मासळी खरेदी केल्यानंतर दोन्ही बॅग हातात घेऊन हात वर करून त्याचा आनंद व्यक्त करताना पुणे येथील पर्यटक.
----
हर्णै बंदरात मासळीप्रेमींची झुंबड
लाखोंची उलाढाल ; मच्छिमारांच्यात समाधान, सीफूड मार्केटचा अनुभव
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २५ ः दिवाळी सुटीत दापोली तालुक्यातील किनारपट्टीवर पर्यटकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. विशेषतः हर्णै बंदरात गेल्या तीन दिवसांपासून सकाळी व संध्याकाळी पर्यटकांची रेकॉर्डब्रेक गर्दी पाहायला मिळत असून, शनिवारी (ता. २५) सकाळी बंदर जत्रेसारखे गजबजून गेले होते. पर्यटकांच्या मासळी खरेदीतून दररोज लाखोंची उलाढाल होत असून, मच्छीमार महिलांना चांगला फायदा मिळत आहे, असे येथील मच्छीमारांनी सांगितले.
हर्णै बंदर हे दापोली तालुक्यातील सर्वात मोठे मासळी केंद्र आहे. या परिसरातील चिमणी बाजार हे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत असून, ताज्या मासळीच्या लिलावात सहभागी होण्याचा वेगळाच अनुभव पर्यटक घेत आहेत. कोळंबी, सुरमई, पापलेट, बांगडा, म्हाकुळ, बेबी म्हाकुळ, बग्गा आदी जातींना मोठी मागणी आहे. लिलावातील बोली लावताना पर्यटकांना ‘सीफूड मार्केट’चा अनोखा अनुभव मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मासळीची आवकही मुबलक झाल्याने खवय्यांची चांगलीच चंगळ उडाली आहे.
दिवाळीच्या सलग सुटीत दाभोळ ते केळशी किनारपट्टीवरील हॉटेल्स व रिसॉर्ट्स फुल्ल झाले आहेत. ‘झिंगा फ्राय’, ‘पापलेट थाळी’, ‘सुरमई थाळी’, ‘कोळंबी बिर्याणी’ कोळंबीचा रस्सा, मच्छीफ्राय आणि ‘खेकड्याचा रस्सा’ यांसारख्या कोकणी मसालेदार डिशेसचा पर्यटकांना मोह आवरत नाही. अनेक पर्यटक बंदरातून मासळी खरेदी करून थेट रिसॉर्टमध्ये ती तयार करून खात आहेत. ‘दापोलीला आलो आणि हर्णै बंदरातली ताजी मासळी खाल्ली नाही, असं होत नाही,’ असे पर्यटक आवर्जून सांगतात. पर्यटकांची गर्दी एवढी वाढली की, मुरूडपासून हर्णै बीचपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहने रस्त्याच्या कडेला कुठे मोकळी जागा दिसेल तिथे पर्यटक आपली वाहने उभी करत होती. पोलिस प्रशासनाने १० ते १५ कर्मचारी तैनात केले असले तरी ट्रॅफिक आटोक्यात आणणे अवघड होत होते.
---
कोट
हर्णै बंदर परिसर खूप छान आहे. गेले दोन ते तीन वर्ष आम्ही या ठिकाणी येत आहोत. या अशा निसर्गरम्य वातावरणात खूप छान वाटतं. या ठिकाणी मासळीदेखील चांगली मिळाली.
-विश्वास खंडागळे, पर्यटक, पुणे
---
कोट
यावर्षी पर्यटकांची खूपच गर्दी झाली आहे. व्यवस्थादेखील कमी पडली, एवढी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आहे.
-नितीन शिगवण, आदर्श रेसिडेन्सी, हर्णै

चौकट
मासळीचा दर
सध्या बंदरामध्ये म्हाकूळ ३५० रुपये किलो, पापलेट ८०० रुपये, सुरमई ६०० रुपये, कोळंबी (जाडी) ३०० रुपये, बांगडा १०० रुपये, सरगा ३५० रुपये असे दर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्ना ठरला बिग बॉस 19 चा विजेता, फरहाना भट्ट ठरली रनरअप

Mumbai: बीएमसीच्या प्रारूप मतदार यादीत मोठे बदल; चार वॉर्डमध्ये ५०% पेक्षा जास्त वाढ, तर २४ वॉर्डमध्ये घट

Khandala : सातारा-पुणे मार्गावर भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक, ट्रकचालक फरार

रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक फिस्कटले! हुतात्मा, वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरला वेळेत, पण दक्षिणेकडे जाणाऱ्या ‘या’ गाड्या २ ते ३ तासांनी धावताहेत उशिराने

Nanded Drug Seizure : शिवणीत तुरीच्या ताशेत लपवलेला ‘गांजा’ उघड; पोलिसांची धाड, ₹1.60 लाखांचा मुद्देमाल जप्त!

SCROLL FOR NEXT