00829
वाळूविना ‘घरकुल’ बांधकामे थांबली
वायंगणी ग्रामपंचायत; वेंगुर्लेत तहसीलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २७ ः प्रधानमंत्री व मोदी आवास (ग्रामीण) योजनेंतर्गत मंजूर घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू पुरवठा करा, अशी मागणी वायंगणी ग्रामपंचायतीमार्फत तहसीलदार ओंकार ओतारी यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांना निवेदनही दिले.
वायंगणी सरपंच दत्ताराम ऊर्फ अवी दुतोंडकर यांनी तहसीलदारांची भेट घेऊन हे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत वायंगणी हद्दीत प्रधनमंत्री व मोदी आवास (ग्रामीण) अंतर्गत ७१ घरकुल मंजूर आहेत. ती तत्काळ पूर्ण करावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) यांचे ग्रामपंचायतीला आदेश आहेत व त्याप्रमाणे ग्रामपंचायत याचा सतत आढावा घेत आहे. याबाबत लाभार्थ्यांच्या घरकुल बांधकाम सुरू करण्याविषयी तीन वेळा सभा घेतल्या. तसेच तीन पत्रे दिली. त्यावेळी वाळूची अनुपलब्धता ही लाभार्थ्यांची सर्वांत महत्त्वाची अडचण असल्याचे समोर आले. ही बाब सर्वच लाभार्थ्यांनी निदर्शनास आणून दिली. प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला ५ ब्रास वाळू देण्याचे शासनाने जाहीर केले होते. मात्र, त्याप्रमाणे वाळू उपलब्ध होत नाही, तसेच खासगी व्यावसायिकांकडे वाळू लिलाव प्रक्रिया झालेली नसल्यामुळे वाळू उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत लाभार्थ्यांची स्थिती ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे. त्यामुळे घरकुल बांधकामे थांबली आहेत. लाभार्थ्यांचा विचार करून वाळू उपलब्ध करून देण्याविषयी शासन स्तरावर मागणी करावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, युवामोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, सायमन आल्मेडा, ग्रामपंचायत सदस्य विनू मठकर, महेश मुणनकर, विद्या गोवेकर यांच्यासहित घरकुल लाभार्थी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.