-rat१p२८.jpg-
२५O०१८२०
पावस ः नाखरे येथे पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करताना पोलिसपाटील सुधीर वाळिंबे, कृषी सहाय्यक दीपाली साळुंखे.
----
पावस पंचक्रोशीला पावसाने झोडपले
वाहतूक विस्कळीत; गौतमीला पूर, पोकलेन पुरात अडकले
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १ ः पावस परिसरामध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून, या वादळीवाऱ्यामुळे परिसरामधील भातशेती व नाचणी पिकाला धोका पोहोचला असून अनेक पिके जमीनदोस्त झाली आहेत. शुक्रवारी (ता. ३१) रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे गौतमी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. सकाळी स्वामी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी आल्याने येथील वाहतूक विस्कळीत झाली होती. दुपारनंतर येथील पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
कालपासून पडलेल्या पावस परिसरातील पावसाच्या दमदार हजेरीमुळे परिसरामध्ये ९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसमध्ये शुक्रवारी (ता. ३१ ऑक्टोबर) गौतमी किनारी नवीन पुलाच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसाने गौतमी नदीला आलेल्या पुरामध्ये पुलाच्या कामासाठी आणलेल्या दोन पोकलेन पुराच्या पाण्यात अडकल्या आहेत. हे पाणी ओसरल्याशिवाय मशिन पाण्याबाहेर काढता येणार नाहीत. त्यामुळे या मशिनचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे भातखाचरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने भातशेती, नाचणी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापलेले पीक पाण्यावर तरंगत असल्याने शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे. नाखरे गावातील, सरपंच, उपसरपंच, पोलिसपाटील, कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त भाताची पाहणी करून पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली आहे,
चौकट
गौतमीला नोव्हेंबरमध्ये पूर
गेले सहा महिने पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे परिसरातील जनजीवन वारंवार विस्कळीत होत आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये नोव्हेंबरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गौतमी नदीला पूर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे नदीपात्रामध्ये पुलाच्या बांधकामासाठी सुरुवात करण्यात आली होती. त्यासाठी आणलेले साहित्य या पुराच्या पाण्यात वाहून गेले.
चौकट
पावसाची नोंद मिलिमीटरमध्ये
पावस* ९६.०० मिमी
जयगड* ५०.००
मालगुंड* ४८.००
खेडशी* ६९.००
रत्नागिरी* ४३.००
तरवळ* ७२.००
फणसोप* ८७.००
पाली* ६८.००
कोतवडे* ५१.००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.