फोटो मोठे घ्या
01832
01833
पाडलोस ः अवकाळी पावसामुळे पाण्यात बुडालेली भातशेती.
शेकडो एकर भातशेती पाण्याखाली
पाडलोस परिसरात नुकसान; ‘अवकाळी’मुळे शेतकऱ्याची परिस्थिती बिकट
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ ः गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शुक्रवार (ता. ३१) आणि आज झालेल्या मुसळधार पावसामुळे पाडलोस, मडुरा, रोणापाल, निगुडे, कास, सातोसे, न्हावेली, दांडेली, बांदा, वाफोली, इन्सुली, विलवडे आणि ओटवणे या भागांतील शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली. काही ठिकाणी नदी-नाले ओसंडून वाहत होते, तर पाणी शेतात घुसल्याने उभे पीक पूर्णपणे बुडाले.
कर्ज काढून शेती केलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. ''सरकार सातबारा कोरा करत नाही आणि अवकाळी पाऊस आमची पाठ सोडत नाही,'' अशा शब्दांत शेतकऱ्यांचा संताप व्यक्त होत आहे. हंगामभर मेहनत करून उभे केलेले पीक आता कुजत असून कापणी सुरू करण्याआधीच सगळे श्रम वाया गेल्याचे मडुरा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी सांगितले.
अवकाळी पावसामुळे शेतीचे वारंवार होणारे नुकसान पाहून काही शेतकऱ्यांनी भविष्यात शेती न करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने अशा परिस्थितीत नुकसान भरपाई दिल्यास शेतकरी सावरू शकतो. सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या कोपाला सामोरा जात असून, त्याचे श्रम आणि स्वप्न मात्र पावसाच्या पाण्यात विरघळले आहेत.
..................
चौकट
निकष लावल्याने नाराजी
सरकारकडून पंचनाम्याचे काम सुरू झाले असले, तरी त्यासाठी विविध निकष लावण्यात येत असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. अनेक शेतकरी दुसऱ्यांच्या जमिनीत शेती करतात, ते कागदपत्रे देऊ शकत नाहीत, त्यांचे काय० याची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा अंदाज घ्यावा आणि तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी मडुरा तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रीतेश गवंडे यांनी केली आहे.
....................
कोट
अवकाळी पावसामुळे शेतीसोबतच गावातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. रस्ते आणि पाण्याचे प्रवाह अडथळ्यांमुळे अनेक ठिकाणी बंद झाले आहेत. ग्रामीण भागात आता सरकारकडून तातडीची मदत आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अपेक्षा आहे. - गुरुदास गवंडे, माजी उपसरपंच, निगुडे
.....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.