03927
पिंगुळी ः श्री देव महापुरुष वाचनालय व ग्रंथालय शेटकरवाडी यांच्या वतीने घेतलेल्या राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ले स्पर्धेतील प्रथम क्रमांक मल्हारगड.
03928
पिंगुळी ः द्वितीय क्रमांक प्राप्त ऋत्वी धुरी यांनी बनविलेली राजगडाची प्रतिकृती
03929
पिंगुळी ः सिद्धी दळवी यांनी साकारलेल्या रायगडाच्या प्रतिकृतीला तृतीय क्रमांक मिळाला. (छायाचित्रे ः अजय सावंत)
बालकांनी कल्पनाशक्तीने उभारले ‘स्वराज्याचे दुर्ग’
पिंगुळीतील स्पर्धेस प्रतिसाद; मानस मोर्ये प्रथम, ऋत्वी द्वितीय, सिद्धी तृतीय
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ ः तालुक्यातील पिंगुळी-शेटकरवाडी येथील किल्ले-गड बनविण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मानस मोर्ये यांच्या ‘मल्हारगडा’ला, द्वितीय क्रमांक ऋत्वी धुरींचा ‘राजगड’, तर तृतीय तृतीय क्रमांक सिद्धी दळवी यांनी साकारलेल्या ‘रायगडा’ला देण्यात आला. प्रथमच घेण्यात आलेल्या या स्पर्धेत १६ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
श्री देव महापुरुष वाचनालय व ग्रंथालय शेटकरवाडी-पिंगुळी यांच्या वतीने यावर्षी प्रथमच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील गड व किल्ले यांचे जतन व संवर्धन व्हावे, गड-किल्ल्यांची प्रत्येकामध्ये आठवण व साठवण राहावी, या अनुषंगाने गड व किल्ला बनविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण परीक्षक कलाशिक्षक संदीप साळस्कर, गणेश मूर्तिकार सुभाष लाड, अशोक सर्वेकर, अर्जुन राणे, अजय सावंत यांनी केले. शेटकरवाडीत या किल्लेगड स्पर्धेत १६ स्पर्धकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले साकारले.
स्पर्धा परीक्षण प्रसंगी उद्योजक मदन दळवी, ज्येष्ठ ग्रामस्थ सुरेश पालकर, श्री देव महापुरुष वाचनालय व ग्रंथालय अध्यक्ष रमाकांत केरकर, पद्माकर ठाकूर, नूतन गावडे, प्रसाद दळवी, पप्पू दळवी, सयाजी मोर्ये, रामदास आगलावे, सचिन पालकर, संजय सावंत, संतोष शेटकर, प्रवीण सावंत, विजय मोर्ये, बाबा मोर्ये, महेश दळवी आदी उपस्थित होते. स्पर्धेत ओम दळवी, चंदन ठाकूर, ऋत्वी धुरी, ओम पाटील, तन्वी दळवी, सात्विक दळवी, ऋषभ सावंत, आयुष दळवी, श्वेता मोर्ये, चिन्मय मोर्ये, समर्थ पालकर, समीक्षा गावडे, मानस मोर्ये, विघ्नेश सावंत, भाग्येश मोर्ये, सृष्टी शेटकर, तनू सावंत, गौरेश वटलेकर, पार्थ कदमसह त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग घेतला.
----
‘प्रतापगड’, ‘तोरणा’ उत्तेजनार्थ
रचनात्मक मांडणी, रंगसंगती आणि एकूणच सादरीकरण या अनुषंगाने या सर्व चिमुकल्या कलावंतांनी कल्पक बुद्धीतून अतिशय लक्षवेधी किल्ले साकारले. या किल्ल्यांमध्ये मल्हार गड, राजगड, दुर्गदुर्गेश्वर रायगड, प्रतापगड, तोरणा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किल्ला आदी एकाहून एक सरस किल्ले, गडाच्या प्रतिकृती साकारल्या होत्या. या स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक प्रतापगड, तोरणा या किल्ल्यांना देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.