कोकण

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे गणित संबोध परीक्षेमध्ये यश

CD

09463

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे
गणित संबोध परीक्षेमध्ये यश

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळातर्फे घेतलेल्या गणित संबोध परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. या परीक्षेत प्रशालेतील पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यामध्ये रुद्र मालवणकर, कविश पेडणेकर, गायत्री तानावडे, ऐश्वर्या तेली, सई नाईक, जान्हवी जानकर, जान्हवी सावंत या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त केली. वरद राणे, गिरिजा चव्हाण, केवल मांद्रेकर, नीलया शिंदे, वरद सावंत, पार्थ मुंडये, लिशा सावंत या विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, आराध्य शेटवे, यज्ञेश पवार, प्रजय सावंत, नुवैरा सय्यद, जान्हवी तुळसकर, आरूष वाडकर, अद्वैत ठाकूर, नुमान नदाफ या विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तसेच यश्विनी खवणेकर हिने तृतीय श्रेणी प्राप्त केली. पन्नासपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळातर्फे परीक्षेच्या पुढील सरावासाठी म्हणजेच गणित प्राविण्य परीक्षेसाठी निवडले गेले. या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या विद्यार्थ्यांना सहायक शिक्षिका प्राची साळगावकर व झेबा बेग यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे संचालक रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका प्राची साळगावकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Microsoft India Investment : 'मायक्रोसॉफ्ट' भारतात दीड लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करणार; सत्या नडेलांची मोठी घोषणा!

Dhananjay Munde: वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी 35 वकिलांची फौज; पैसा कोण पुरवतंय? कोर्टाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न

Latest Marathi News Live Update : देवेंद्र फडणवीस हे सावजीसारखे तिखट आणि संत्र्यासारखे गोड- एकनाथ शिंदे

Mumbai News: रिक्षाचालक मुंबईच्या गतीचे हृदय! मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन

Central Railway: नाताळ-नववर्षासाठी मध्य रेल्वेच्या ७६ विशेष गाड्या; पण कोणत्या मार्गावर? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT