David Warner Out Of T20 Series 
क्रीडा

Ind vs Aus T20 Series : संघाला वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर वॉर्नर गेला घरी! भारताविरुद्धच्या मालिकेतून अचानक घेतली माघार

Kiran Mahanavar

David Warner Out Of T20 Series : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने भारताविरुद्धच्या आगामी 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतून आपले नाव मागे घेतले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पहिला टी-20 सामना 23 नोव्हेंबरला विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे.

वर्ल्ड कप 2023 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या वॉर्नरने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. वॉर्नर सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. आणि त्याने वर्ल्ड कपमध्ये 500 हून अधिक धावा केल्या आहेत.

वॉर्नर का खेळणार नाही टी-20 मालिका ?

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने टी-20 मालिका खेळण्याऐवजी ऑस्ट्रेलियाला परतण्याचा निर्णय घेतला आहे. कारण शेवटच्या कसोटी मालिकेपूर्वी त्याला घरी राहायचे आहे. सिडनीत पाकिस्तानविरुद्धच्या नवीन वर्षातील सामन्यानंतर प्रदीर्घ फॉर्मेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार केल्याचे त्याने आधीच सांगितले होते. पुढील वर्षी टी-20 वर्ल्ड कप आहे आणि त्यामुळे आता या फॉरमॅटमध्ये खेळणे खूप महत्त्वाचे झाले आहे.

वॉर्नरच्या जागी अष्टपैलू आरोन हार्डीचा ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पांढऱ्या चेंडूच्या दौऱ्यात त्याचे एकदिवसीय आणि टी-20 दोन्ही पदार्पण करण्यात आले आहे.

T20 मालिकेचे वेळापत्रक

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. यानंतर, दोन्ही संघ 26 नोव्हेंबरला त्रिवेंद्रम आणि 28 तारखेला गुवाहाटी येथे मुकाबला करतील. 1 डिसेंबर रोजी रायपूर आणि 3 तारखेला बेंगळुरू येथे सामने होणार आहेत.

ऑस्ट्रेलिया टी-20 संघ : मॅथ्यू वेड (कर्णधार), अॅरॉन हार्डी, जेसन बेहरेनडॉर्फ, सीन अॅबॉट, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, केन रिचर्डसन, अॅडम झंपा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Manager Work Pressure Death: खळबळजनक! बारामतीत 'Workload'मुळे बँक मॅनेजरने बँकेतच गळफास लावून दिला जीव

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरे दोन तास एकाच हॉटेलमध्ये; भेट झाली नसल्याची सूत्रांची माहिती

BMC Election: निवडणुकीनंतर 14 गावे बाहेर काढणार; गौप्यस्फोट करत वनमंत्र्यांनी यादीच दिली

Karad News : विधीमंडळातील मारामारीप्रकरणी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचा थेट सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...

Rahul Gandhi: ''मोदीजी, 'त्या' पाच लढाऊ विमानांचं सत्य काय?'' राहुल गांधींकडून थेट निशाणा

SCROLL FOR NEXT