Family sakal
लाइफस्टाइल

नातीगोती : कुटुंबावर प्रेम करा

माझ्या मते कुटुंबव्यवस्था प्रेमावर आधारित असते; पण त्याच्यापेक्षाही जास्त घरातील सगळ्या सदस्यांनी आपापली जवाबदारी पार पडली, तर सगळी व्यवस्था आरामात छान चालते.

सकाळ वृत्तसेवा

- मयांक मिश्रा

माझ्या मते कुटुंबव्यवस्था प्रेमावर आधारित असते; पण त्याच्यापेक्षाही जास्त घरातील सगळ्या सदस्यांनी आपापली जवाबदारी पार पडली, तर सगळी व्यवस्था आरामात छान चालते.

माझी आई माझ्या सर्वांत जवळची व्यक्ती आहे. तिचा विनोदी स्वभाव मला खूप आवडतो; कारण मी उदास असलो, किंवा कुठल्याही गोष्टीचा तणाव असेल, तेव्हा ती मला लगेच हसवते आणि मला असा वाटतं, तीच हे करू शकते. ती सगळ्या परिस्थितीत खंबीरपणे उभी राहते. मला तिच्या या कृतीचं खूप कौतुक वाटतं.

माणसाच्या आयुष्यात अशी वेळ येतो, जेव्हा तो खूप उदास होतो आणि त्याला दिशा नाही मिळत नाही, अशा वेळी पाठिंबा आणि दिशा देणाऱ्याची गरज असते. माझ्या बाबतीतही एकदा असं झालं, तेव्हा माझ्या आईनं मला खूप सांभाळून घेतलं आणि परत आपल्या पायावर उभं राहण्यासाठी प्रोत्साहित केले. आपल्याला काय त्रास होतो आहे, हे तिला लगेच कळतं आणि माझी हिंमत तुटू नये म्हणून तिनं मला खूप वेळा अप्रत्यक्षपणे मदत केली आहे.

माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य मजेशीर स्वभावाचे आहेत. सगळे एक से एक विनोदी आहेत. त्यामुळे आमच्या घरात नेहमीच आनंदी वातावरण असतं. कोणी नातेवाईक किंवा शेजारी आले, तर त्यांना आम्ही खूप हसवतो आणि त्यांची घरातून निघायची इच्छा होत नाही.

मी सध्या ॲण्ड टीव्हीवरील ‘दुसरी माँ’ या मालिकेत अरविंद गुप्ता याची भूमिका साकारत आहेत. सध्या मी जयपूरला आहे; पण जेव्हा मी घरी जातो तेव्हा आम्ही खूप मज्जा करतो. घरी सगळे एकत्र जेवण बनवतो, पत्ते खेळतो आणि गप्पागोष्टी होतच असतात.

मला असं वाटतं, की प्रत्येकासाठी कुटुंबाचं महत्त्व किती आहे, या गोष्टीची जाणीव आपल्या सगळ्यांना कोरोनाकाळात झाली असेल. त्यावेळी सर्वांनीच एकमेकांची काळजी घेतली. या परिस्थितीनं कुटुंबाची खूप चांगली जाणीव करून दिली.

नातेसंबंध चांगले होण्यासाठी एकमेकांना आदर द्यावा आणि समजुतीनं वागावं. त्यामुळे आपण नात्यांमध्ये सुधार करू शकतो.

नाती दृढ होण्यासाठी…

१. एकमेकांचा आदर करा.

२. कुटुंबातील प्रत्येक सदस्यासोबत समजुतीने वागावे.

३. कुटुंबावर अपार प्रेम करा.

४. सगळ्यांशी संवाद ठेवा.

५. खोटं कधीच बोलू नका आणि कोणाला दुखवू नका.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Balaji: ‘तिरुपती’चे चार कर्मचारी धर्मावरुन निलंबित; देवस्थानचं अधिकृत प्रसिद्धीपत्रक

Western Railway: मध्यनंतर पश्चिम रेल्वे कोकणवासियांसाठी सरसावली! गणेशोत्सवासाठी सोडणार विशेष गाड्या

Hardik Pandya - Jasmin Walia: हार्दिक - जास्मिन यांच बिनसलं? या घटनेमुळे ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

Pune News : सुनेने दाखल केलेल्या दाव्यातून वगळण्याचा माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह इतरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

Latest Maharashtra News Updates : देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंची भेट

SCROLL FOR NEXT