हिवाळ्यात जिथे विजेचे बिल कमी येते, तिथे उन्हाळ्यात हजारोंच्या रुपयाने बिल येतं.
उन्हाळा सुरु होतोय. आतापासूनच लोकांना घाम फुटू लागला आहे. हिवाळ्यात जिथे विजेचे बिल कमी येते, तिथे उन्हाळ्यात हजारोंच्या रुपयाने बिल येतं. एसी, फ्रीज, कूलर आणि वॉशिंग मशीनचा वापर उन्हाळ्यात जास्त होतो, अशा पद्धतीने बिलही अधिक येणारच. ज्याचा परिणाम आपल्या खिशावर होतो. पण आवश्यक त्या टिप्स पाळल्या तर तुमचं वीजबिल 50 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतं. यामध्ये तुम्हाला कंजुषी करुन एसी चालवावा लागणार नाही किंवा उकाड्यातही राहावे लागणार नाही. फक्त थोडं सावध राहायला हवं. अशा टिप्स जाणून घेऊयात, ज्यामुळे तुमचं वीजबिल कमी होऊ शकतं. (Tips To Reduce Electricity Bill)
सोलर पॅनेल लावा-
सोलर पॅनलचे पर्याय भारतात सर्वोत्तम आहेत. भारतात महिन्यात ३० दिवस ऊन असते. तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनेल लावू शकता. ही एकवेळची गुंतवणूक (One Time Investment)आहे, पण त्यामुळे तुमचं वीजबिल कमी होऊ शकतं. तुम्ही ऑनलाइन रिसर्च करून तुमच्या घराप्रमाणे सोलर पॅनेल लावू शकता.
एलईडी लाइट लावा-
एलईडी लाइटमुळे वीज वापर कमी होतो आणि प्रकाशही चांगला येतो. त्याचबरोबर उर्वरित उपकरणे 5 स्टार रेटिंगसह घ्या. तुमची वीजही शिल्लक राहील.
अशा प्रकारेही विजेची बचत करू शकता-
बल्ब आणि ट्यूब लाइटमधून सीएफएल पाचपट वीज वाचवते, त्यामुळे ट्यूबलाइटऐवजी सीएफएल वापरा. जर तुम्हाला खोलीत प्रकाशाची गरज नसेल तर ते बंद करा. इन्फ्रारेड सेन्सर्स, मोशन सेन्सर्स आणि डायमर सारख्या गोष्टींचा वापर करा.
सिलिंग आणि टेबल फॅनचा अधिक वापर करा
उन्हाळ्यात एसीपेक्षा सिलिंग आणि टेबल फॅनचा जास्त वापर करा. त्यासाठी प्रतितास ३० पैसे खर्च येतो, तर एसी ताशी १० रुपये या दराने चालतो. एअर कंडिशनर चालवायचा असेल तर २५ डिग्रीवर सेव्ह करा. त्यामुळे वीज वापरही कमी होईल. तसेच एसी सुरू असलेल्या खोलीचा दरवाजा बंद करा.
फ्रिजवर ठेवू नका कुकिंग रेंज -
मायक्रोवेव्हसारख्या वस्तू फ्रीजवर अजिबात ठेवू नका. यामुळे वीज वापर अधिक होतो. फ्रीजला थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. फ्रीजच्या सभोवतालच्या एअरफ्लोला पुरेशी जागा द्या. गरम पदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नका. प्रथम, ते थंड होऊ द्या. कम्प्युटर आणि टीव्ही चालवल्यानंतर वीज बंद करा. मॉनिटर स्पीड मोडमध्ये ठेवा. फोन आणि कॅमेरा चार्जरचा वापर केल्यानंतर तो प्लगमधून काढून टाका. प्लग-इन असताना विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.