MNS esakal
महाराष्ट्र बातम्या

दुप्पट वेगाने आम्ही उसळी घेऊ, लावा ताकद ! मनसेचा मविआला इशारा

दुप्पट वेगाने आम्ही उसळी घेऊ

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : दोन मे पासून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सल्तनतने आम्हा महाराष्ट्र सैनिकांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लावला होता. अनेकांना स्थानबद्ध केले. अनेकांना अटक केली, जेलमध्ये टाकले. आमच्या पदाधिकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास दिला (अजुनही देत आहेत). या व अशा अनेक प्रकारे आमचे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रयत्न झाले. पण आमचे महाराष्ट्र सैनिक या सगळ्याला पुरुन उरले, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) केली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांनी राज्य सरकारचा समाचार घेत आपली भूमिका स्पष्ट केली. (MNS Leader Nitin Sardesai Attack On Mahavikas Aghadi Government)

सरदेसाई म्हणाले, जेल भोगली, तडीपारी भोगली आणि कोणताही अनुचित प्रकार न करता महाराष्ट्रातील अनाधिकृत भोंग्याचा आवाज बंद करुन सुद्धा दाखवला. महाराष्ट्रातील सल्तनतने पोलिसांवर दबाव टाकून नको त्या गुन्ह्यांची कलमे लावून आमच्या महाराष्ट्र सैनिकांना अडकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण आम्ही जसे रस्त्यावर संघर्ष करुन न्याय मिळवतो. त्याच प्रमाणे आम्ही न्यायालयीन लढाई सुद्धा तेवढ्याच ताकदीने लढून, संघर्ष करुन, न्याय मिळवण्यात यशस्वी झालो, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडी सल्तनतच्या या दमनशाहीला अंगावर घेऊन, महाराष्ट्रातील जनतेला आवाजाच्या त्रासातून मुक्त करणाऱ्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना माझा सलाम. कायदेशीर प्रक्रियेत महाराष्ट्र सैनिकांच्या मागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या सर्व वकील मंडळी व महाराष्ट्र नवनिर्माण जनहित कक्ष यांचे विशेष आभार ! आपले सहकारी अडचणीत असल्याने त्यांच्या सुटकेसाठी धावपळ करणाऱ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना (MNS) साष्टांग दंडवत. शेवटी एवढंच सांगेन, आम्हाला दाबायला जेवढी ताकद लावाल त्याच्या दुप्पट वेगाने आम्ही उसळी घेऊ. लावा ताकद. जय महाराष्ट्र, असे नितीन सरदेसाई म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: कर्जमाफी समिती लागली कामाला; चंद्रशेखर बावनकुळे, बच्चू कडू यांनी आंदोलनाची घाई करू नये

Power Bank Overuse: पॉवर बॅकचा अतिवापर फोनसाठी घातक, वेळीच काळजी घ्या! अन्यथा फोनची बॅटरी...

Nagpur Accident: नागपुरात रस्ते अपघातांत सर्वाधिक मृत्यू दुचाकीचालकांमुळे; ६९ अपघातांत ७८ जणांचा मृत्यू

Girish Mahajan : गिरीश महाजन आणि माणिकराव कोकाटे यांच्यातील प्रशासकीय संघर्ष तीव्र

Pune Crime : पुण्यात वाहतूक पोलिसानं गळफास घेऊन संपवलं जीवन; पत्नीनं अनेक वेळा फोन केला, शाळा सुटल्यावर मुलंही घरी परतली, पण..

SCROLL FOR NEXT